07 December 2019

News Flash

दोन दिवस भटकंतीचे : कोपरगाव

कोपरगाव हे नगर जिल्ह्य़ातील गाव साखर कारखान्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

किल्ले आणि त्यांच्या पोटात असलेली जैन लेणी पाहण्यासारखी आहेत.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

शनिवार

कोपरगाव हे नगर जिल्ह्य़ातील गाव साखर कारखान्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कोपरगावच्या उत्तरेला मनमाडकडे जावे. 2वाटेत १८ किमीवर पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले येवला येते. येथे पैठणी कशी करतात ते पाहता येते. तिथून मनमाडला जाताना अंकाई-टंकाई हे जुळे किल्ले आहेत. किल्ले आणि त्यांच्या पोटात असलेली जैन लेणी पाहण्यासारखी आहेत. ट्रेकिंगची सवय असेल तर तिथेच परिसरात कातरा, मेसणा हे किल्ले तसेच हद्बीची शेंडी हा सुळका आणि शंभू, गोरखनाथ हे डोंगर आहेत, तिथे जावे.

रविवार

कोपरगावच्या शेजारी ६ कि.मी.वर असलेल्या कोकमठाणला जावे. गोदावरीच्या काठी हे प्राचीन सुंदर मंदिर आहे. तीन गाभारे आणि सभागृहातील अतिशय सुबक कोरलेले छत यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. आतील मूर्तिकामसुद्धा अप्रतिम आहे. कोपरगावच्या दुसऱ्या दिशेला कोपरगाव बेट आहे. तिथे नदीकाठी राघोबा पेशवे यांचा वाडा आहे. वाडय़ाच्या प्रचंड मोठय़ा भिंती शिल्लक आहेत. त्याला तीन भिंतींचा वाडा म्हणतात. तिथे राघोबांची समाधी आहे. जवळच आनंदीबाई पेशव्यांसाठी बांधलेला विटाळशीचा वाडा आहे. दोन मजली वाडय़ाचे लाकडी बांधकाम मुद्दाम पाहण्याजोगे आहे. तिथून पुढे कुंभारीला जावे. तेथील जुन्या मंदिराचे शिखर आणि अत्यंत देखणे असे सीलिंग मुद्दाम पाहावे.

First Published on October 12, 2018 3:14 am

Web Title: places to visit in kopargaon
Just Now!
X