‘प्रीमियर पद्मिनीची’ स्वातंत्रोत्तर भारतात प्रत्येक प्रकारचे एक वाहन बनत होते. अन्य विशिष्ट प्रकारचे वाहन हे एकेका घराण्याची मक्तेदारी ठरली होती. जसे की हिंदुस्थान मोटर्सची सरकारदरबारी आब राखून असलेली अ‍ॅम्बेसेडर, सेना दल, पोलीस इतर सरकारी अधिकाऱ्यांसाठी मिहद्रा जीप तर दक्षिणेत स्टॅण्डर्ड मोटर्स या छोटेखानी आणि स्पोर्टी अशा गाडय़ा बनत असत. तसेच डॉक्टर, वकील, उच्च मध्यमवर्गीयांची प्रीमियर पद्मिनी होती.

१९५२ सालापासून इटलीच्या फियाट कंपनीसोबत परवाना करार करून प्रीमियर ऑटोमोबाइल्स लिमिटेड (पीएएल)(वालचंद हिराचंद ग्रुप) मुंबईतील कुर्ला प्रकल्पात ‘फियाट मिलिसेन्टो’ गाडी बनत असे. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन सरकार ही समाजवादाचा पगडा असलेली होती, अन् त्या वेळी गाडी हा विषय चनीचा ठरवला गेल्याने वाहन उद्योगावर प्रचंड प्रमाणात सरकारी बंधने होती.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
EVM and VV Pat Controversy Occurs Frequently
विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?
AAI JE 2024 registration begins for 490 Junior Executive
AAI JE 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० पदांसाठी होणार भरती, १ मेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

मूळ ढाच्यात विशेष बदल न करता प्रीमियर ऑटोमोबाइल्सने फियाटची ‘मिलिसेन्टो सुपर सिलेक्ट’, डिलाइट अशा नावाची मॉडेल्स बनवीत होती. १९७० च्या आसपास फियाट ११०० डिसी (डिलाइट) या मॉडेलचे नाव ‘फियाट प्रेसिडेंट’ असे करण्यात आले. परंतु तत्कालीन सरकारातील नोकरशहांनी ‘प्रेसिडेंट’ या नावावर हरकत घेतल्याने प्रेसिडेंट नाव बदलून ‘पद्मिनी’ असे नामकरण करण्यात आले.

प्रीमियर पद्मिनीची स्पर्धा प्रामुख्याने हिंदुस्थान मोटर्सच्या अ‍ॅम्बेसेडरशी होत असे. बोजड, गोलाकार आकाराच्या अ‍ॅम्बेसेडरच्या तुलनेत पद्मिनी ही सडसडीत बांध्याची (स्लिक) आणि आधुनिक वाटायची. त्यामुळे तरुणांना अधिक पसंतीस यायची. मुख्य म्हणजे अ‍ॅम्बेसेडरच्या तुलनेत पद्मिनी कमी पेट्रोल खर्च करणारी (फ्युएल एफिशिएंट) आटोपशीर गाडी होती. या मॉडेलमध्ये १०८९ सीसीचे ४ सिलेंडर असलेले इंजिन ४० बीएचपी (३५ केव्ही)आणि ७१ एनएम टॉर्क उत्पन्न करीत असे. कमाल वेगमर्यादा ताशी १३० किमी इतकी होती. कॉलम माउंटेड शिफ्टर पद्धतीचे गियर लिव्हर (स्टिअिरग व्हीलच्या खालील बाजूस डाव्या हाताला गिअर लिव्हर जोडलेले असे) या गाडीमध्ये होते. ४ स्पीड मॅन्युअल गियर बॉक्स वापरलेली ही गाडी रिअर व्हील ड्राइव्ह होती.

पद्मिनी जशी खासगी गाडी म्हणून लोकप्रिय होती तशीच तिने ३० वर्षांहून अधिक काळ मुंबईकरांना  काळी-पिवळी टॅक्सी म्हणूनदेखील सेवा दिली. थोडय़ाबहुत प्रमाणात ती आजही देत आहे.

पद्मिनीच्या ऱ्हासाला कारणीभूत घटक

  • उत्पादकांनी दर्जाबाबत दाखवलेली उदासीनता, ग्राहकाला गृहीत धरण्याची वृत्ती, तत्कालीन सरकारचा वाहन उद्योगक्षेत्राविषयी असलेला दृष्टिकोन आणि १९९१ नंतरचे सरकारचे आर्थिक उदारमतवादी धोरण यापकी पद्मिनीच्या ऱ्हासाला नक्की दोषी कोण, हा खरे तर एक संशोधनाचाच विषय आहे.
  • मारुती उद्योगाने निर्माण केलेले आव्हानाला पुरे पडण्यासाठी उत्पादकांनी पद्मिनीमध्ये एस -१ (एस-वन) नावाने काही बदल करून काढलेली सुधारित आवृत्ती जसे की अधिक इंधन बचतीसाठी ‘मिकोनी उकाल’ कॉबरेरेटर, बकेट सीट्स, फ्लोअर शिफ्ट गिअर्स. पुढे मग १३७ डी नावाने पद्मिनीचे डिझेल इंजिन असलेले मॉडेल काढले गेले. २४ किमी प्रति लिटर मायलेज देणाऱ्या या गाडीने ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी केलेली ती अखेरची धडपड होती. २००० सालच्या आसपास उत्पादक आणि व्यवस्थापनाच्या काही अंतर्गत प्रश्नांनी पद्मिनीचे उत्पादन थांबविले गेले. आणि त्यानंतर या पद्मिनीची वाताहत होत गेली.
  • मारुतीसारख्या अत्याधुनिक जपानी गाडीने आसमंत व्यापायला सुरुवात केली होती. त्यापुढे दर्जाहीन आणि कालबाहय़ झालेल्या भारतीय उत्पादकांची वाहने स्पध्रेत टिकू शकली नाहीत. जपानी, कोरियन, अमेरिकन प्रवासी वाहनांच्या परकीय आक्रमणाने (?) तत्कालीन वाहन उत्पादकांची संस्थाने खालसा झाली. २०१३ पर्यंत गलितगात्र अवस्थेतल्या शेकडो ‘पद्मिनी’ मुंबईच्या रस्त्यावर धावत असलेल्या पाहिल्यावर वाटायचे त्या राणी पद्मिनीप्रमाणे आमच्या पद्मिनी गाडीनेही आपल्या आत्मसन्मानासाठी जोहार केला असता तर बरे झाले असते.

सिनेमाजगताची राणी

  • आजच्या जमान्यात जुन्या तंत्रज्ञानाची ठरलेली ही गाडी हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधनदेखील ठरली. काळीपिवळी पद्मिनी टॅक्सी तर मुंबईचा एक अविभाज्य भाग झाली, सिनेमाजगतात (अमोल पालेकरांचा ‘टॅक्सी टॅक्सी’, नाना पाटेकरांचा ‘नौ दो ग्यारह’) या पद्मिनीचा मुक्त संचार होता. मुंबईच्या नतिक अन् अनतिक धंद्यातसुद्धा पद्मिनीचा सहभाग होता. मुंबईतल्या दंगली, बंद, बॉम्बस्फोट, यामध्ये निष्पाप मुंबईकर चाकरमान्याप्रमाणे शेकडो पद्मिनी टॅक्सीदेखील शहीद झाल्या. अनेक सेलिब्रेटीजची (डॉ. काशिनाथ घाणेकर, रजनीकांत ते आजच्या आमिर खानपर्यंत) पहिली गाडी पद्मिनी होती. मध्यमवर्गाचे पद्मिनी एक स्वप्न होते.
  • भारतातील कार रॅलीच्या शौकिनांनासुद्धा त्या काळी प्रीमियर पद्मिनीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. पद्मिनीच्या सस्पेन्शन, हेड लाइट्समध्ये आवश्यक बदल घडवून इंजिनाला भक्कम करणे तसेच इंजिन हेड, कॉबरेरेटरमध्ये सुधारणा करून या गाडीला रॅली परफॉर्मन्स कार बनविले. ७०-८० च्या दशकातल्या अनेक रॅलीजमध्ये या गाडीने उत्तम कामगिरी केली होती.