05 April 2020

News Flash

पीआरपी

रक्तचाचणीप्रमाणे आपल्या हाताच्या शिरेतून रक्त काढले जाते आणि १० ते १५ मिनिटे सेंट्रीफ्युज केले जाते.

|| सौंदर्यभान – डॉ.शुभांगी महाजन

चेहऱ्याची त्वचा अधिक तरुण आणि तेजस्वी होण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपचार करतात. यात मग काही वेगळे आणि अद्वितीय उपचार करून घेण्याचे धाडससुद्धा ते करतात. त्यापैकीच एक म्हणजे पीआरपी(प्लेटपेट रिप प्लाझ्मा). याला व्हॅम्पायर फेशियल किंवा ड्रॅकुला थेरपी असेही म्हणतात.

पीरपी म्हणजे काय?

रक्तचाचणीप्रमाणे आपल्या हाताच्या शिरेतून रक्त काढले जाते आणि १० ते १५ मिनिटे सेंट्रीफ्युज केले जाते. सेंट्रीफ्युज दरम्यान रक्तातील प्लेटलेट्स इतर घटकांपासून वेगळ्या होतात, असा प्लेटलेटसमृद्ध प्लाझ्मा (पीआरपी) शरीराच्या विशिष्ट भागावर इंजेक्शनद्वारे दिला जातो. यात प्लेटलेट्सव्यतिरिक्त अनेक वाढीचे घटक आणि प्रथिनेदेखील असतात. जे त्वचेखाली फोलॅजेम तयार करण्यास मदत करतात. तसेच उतींचे पुनरुज्जीवन करून त्वचा गुळगुळीत आणि घट्ट करण्यास मदत करतात. त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचा नितळ, तरुण आणि टवटवीत बनवतात.

वापर कुठे?

 •  चेहऱ्याचा कायाकल्प करण्यासाठी
 •  डोळ्याभोवतीच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी
 •  त्वचेवरील खड्डे व छिद्रे घालविण्यासाठी
 •   उन्हामुळे त्वचेवर होणारे परिणाम घालविण्यासाठी
 •   चेहरा, मान व जबडय़ावरील सैल त्वचा घट्ट करण्यासाठी
 •   केसगळती कमी करून केसांची वाढ करण्यासाठी
 •   प्रसूतीनंतर सैल झालेले पोट घट्ट करण्यासाठी

फायदे

 •   पीआरपी ही शस्त्रक्रिया नसलेली प्रक्रिया आहे.
 •   ३० ते ६० मिनिटात पूर्ण प्रक्रिया करता येते.
 •  याचा परिणाम १ ते २ वर्षांपर्यंत राहतो.
 •  स्वत:च्या रक्तातील घटक वापरले जात असल्याने संक्रमणाचा किंवा अ‍ॅलर्जीचा धोका उद्भवत नाही. (१०० टक्के नैसर्गिक उपचारपद्धती)

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:02 am

Web Title: prp beauty skin face plateau rep plasma dracula therapy akp 94
Next Stories
1 डॉक्टर तुम्हीसुद्धा..
2 ‘भारत मानक ६’ कडे जाताना
3 बाजारात नवे काय? : ‘क्रेटा’ नव्या रूपात
Just Now!
X