News Flash

शहरशेती : घरात झाडे कशासाठी?

घरातील दृष्य बाहेर दिसू नये म्हणूनही झाडे लावली जातात.

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र श्रीकृष्ण भट

घरात झाडे लावण्यामागे प्रत्येकाचे वेगवेगळे उद्देश असतात. कोणी केवळ सजावटीसाठी झाडे लावतात तर कोणी हवा शुद्ध ठेवण्यासाठी. दोन घरांच्या खिडक्या समोरासमोर असतील किंवा घर तळ किंवा पहिल्या मजल्यावर असेल, तर घरातील दृष्य बाहेर दिसू नये म्हणूनही झाडे लावली जातात. आपला उद्देश काय हे ओळखून त्यानुसार झाडे लावावीत.

आकर्षक पानांसाठी

थोडे ऊन – डायफनबेकिया, कॅलॅडियम, ड्रेसेना इ.

परावर्तीत सूर्यप्रकाश – झेब्रेना, ट्रॅडस्कॅशिया, सिंगोनियम, शॅफेलेरा, अरेलिया. सावली – कॅल्शिया, क्रोटॉन, बेग्नोनियम, फर्न, रिबनग्रास, अ‍ॅग्लोनिमा.

आकर्षक फुलांसाठी

थोडे ऊन – अ‍ॅडेनियम, जिरॅनियम, क्लोरोडेंड्रम, वॉलिचिया, सुगंधी फुलांसाठी पांढरा कवठी चाफा, पिवळा कवठी चाफा, कामिनी.

परावर्तीत प्रकाश – ऑकिड्स, हेलिकोनिया, पीस लिली (स्पॅथिफायलम), बाल्सम. सावली- कॅन्थुरियम.

टांगून ठेवण्यासाठी 

शतावरीचे काही प्रकार आणि नेचे (फर्न) प्रकार

हिरव्या रंगासाठी 

फिशटेल फर्न, बोस्टन फर्न, टॅटू फर्न, अ‍ॅस्पेरॅगस, रेसिमोसा, पामचे प्रकार, फायकसचे प्रकार, मनिप्लांटचे प्रकार, अरेलियाचे प्रकार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:49 am

Web Title: purposes for planting trees at home
Next Stories
1 ‘डेव्हलपर्स ऑप्शन’चे गूढ
2 मोबाइलवेडात भारत दुसरा
3 ताणमुक्तीची तान : एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करा
Just Now!
X