या आसनात दोन्ही हातांवर शरीर तोलले जाते. या आसनामुळे मनगट, हात, खांदे, पाठ आणि पाठीचा कणा मजबूत होतो. पाय आणि कंबरेलाही ताण बसल्याने तेथील स्नायूंनाही बळकटी मिळते. श्वसन संस्थाही सुधारते. कृती : * दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करत सरळ पुढे ताठ करून बसूया. पाठीचा कणा ताठ असू द्या. * दोन्ही हात कंबरेच्या किंवा खांद्याच्या रेषेत जमिनीवर ठेवा. बोटे बाहेरच्या बाजूला असू द्या. हात ताठ. * मागे झुकून शरीराचे वजन हातांवर टाका. * गुडघे ताठ ठेवा. पायाचे तळवे जमिनीला चिकटवा. आता डोके जमिनीकडे सैल सोडून द्या. * अंतिम स्थितीत स्थिर राहून श्वसन सुरू ठेवा. * श्वास सोडत आसन हळूहळू सोडा.