18 February 2019

News Flash

सेल्फीस  कारण की..

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे

१) रोहन टिप्पे याने ‘आर्थर रोडची आई’ या सामाजिक संस्थेसोबत भिवंडी येथील जुलईपाडा येथील शाळेला भेट दिले. या संस्थेने शाळेत विद्युत उपकरणांची सोय केली आणि पालकांसोबत चर्चासत्रही घेतली. या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रोहन व इतर कार्यकर्त्यांचा सेल्फी. २ ) वंचित मुलांना भेट देऊन त्यांच्यासोबत वेळ घालवताना बसवराज जामखंडी या तरुणाकडील सेल्फी स्टीक पाहून या मुलांनी छायाचित्रासाठी हट्ट धरला. या मुलांचे निरागस हास्य या तरुणाने सेल्फी कॅमेऱ्यात कैद केले.

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर विनाकारण ‘सेल्फी’ काढण्याची हौस दिसून येते. मात्र, आता तुमच्या ‘सेल्फी’ काढण्याला आम्ही एक कारण देत आहोत. सत्कारण. रोजच्या दिनक्रमादरम्यान कोणतेही चांगले काम करताना तुमचा ‘सेल्फी’ काढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा. तुम्ही करत असलेले काम थोरच असावे, असे काही नाही. पण त्यातून तुमची सामाजिक बांधिलकी नक्कीच दिसावी. ‘सेल्फी’ पाठवताना त्याबाबत १०० शब्दांत माहितीही पाठवा. कदाचित तुमच्या सेल्फीचे हे ‘कारण’ उद्या आणखी काहींसाठी प्रेरणा ठरेल.

First Published on February 14, 2018 3:00 am

Web Title: reason behind selfie