|| दीपा पाटील

साहित्य

१ वाटी ओली करंदी, एका लहान कैरीचे तुकडे, १ लहान कांदा बारीक कापून, १ हिरवी मिरची, अर्धा चमचा लसूण वाटण, १ मोठा चमचा आगरी-कोळी मसाला, २ मोठे चमचे चिंचकोळ, ४ मोठे चमचे तेल, १ मोठा चमचा तांदूळ पीठ, मीठ चवीनुसार.

कृती

पातेल्यात तेल गरम करा, त्यात कांदा, लसूण वाटण परतवा. नंतर कैरीचे तुकडे टाकून एक वाफ आणा. त्यात मसाला टाकून परतवा.

करंदी व एक प्याला पाणी टाका. नंतर चिंचेचा कोळ व मीठ टाका. उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ थोडय़ा पाण्यात भिजवून टाका व पुन्हा एक वाफ आणा. एक उकळी आणून शेवटी गॅस बंद करा.