News Flash

शिंगाडय़ाच्या पिठाची बर्फी

शिंगाडा पीठ- एक वाटी   दूध- दोन कप

आरोग्यदायी आहार : – डॉ. सारिका सातव

साहित्य

 • शिंगाडा पीठ- एक वाटी दूध- दोन कप
 •   सुका मेवा (ड्रायफ्रुट्स) बारीक चिरलेला- दोन मोठे चमचे (बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, मनुके) ल्ल   गूळ- पाऊण कप (ठेचलेला)
 •   तूप- अर्धा वाटी ल्ल  वेलचीपूड- पाव चमचा

कृती :

 •    गॅसवर कढई तापवून तूप पातळ करून घ्यावे.
 •    त्यात मंद आचेवर शिंगाडा पीठ चांगले भाजून घ्यावे. ल्ल   नंतर दूध घालून शिजवावे.
 •    शिजत आल्यानंतर गूळ व वेलचीपूड घालून सारखे हलवत राहावे.
 •    गोळा तयार होईपर्यंत हलवावे.
 •    ताटाला तूप लावून तयार झालेला गोळा ताटात घेऊन थापावा.
 •    सुक्या मेव्याचे काप करून टाकावे.
 • थंड होऊ द्यावे.
 •  त्यानंतर वडय़ा पाडाव्यात.

वैशिष्टय़े

 • पोटॅशिअर, मँगनीज, कॉपर इत्यादी भरपूर प्रमाणात.
 •   शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते.
 •   आबालवृद्धांना उपयोगी
 •   मधुमेही व वजन जास्त असणाऱ्यांनी साखर व तूप न घालता बनवावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:43 am

Web Title: recipe barfi akp 94
Next Stories
1 वॉटर फ्लॉसर मुख आरोग्यासाठी वरदान
2 पित्ताशयातील खडे
3 मारुती कारच्या किंमतीही कमी!
Just Now!
X