28 May 2020

News Flash

बीट बर्फी

बीट स्वच्छ धुऊन साल काढून किसून घ्यावे.

 

आरोग्यदायी आहार – डॉ. सारिका सातव

साहित्य

 •  बीट- ३ ते ४,
 •  साखर- १ लहान वाटी,
 •  तूप- २ मोठे चमचे,
 •  किसलेले खोबरे- २ मोठे चमचे.

कृती :

 • बीट स्वच्छ धुऊन साल काढून किसून घ्यावे.
 • कढई गॅसवर ठेवून तूप वितळल्यानंतर किसलेले बीट मिसळूून मंद आचेवर परतून घ्यावे.
 • त्यानंतर त्यात दीड वाटी खोबरे घालून पुन्हा परतून घ्यावे.
 • शेवटी साखर घालून हलवत राहावे.
 • घट्ट गोळा बनू लागल्यानंतर पाहिजे त्या आकारामध्ये बर्फी बनवून घ्यावे.
 • किसलेले खोबरे व ड्रायफ्रूटने सजवावे.
 • थंड झाल्यानंतर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावे.

वैशिष्टय़े

 •  रक्तवाढीसाठी अतिशय उपयुक्त.
 • लहान मुलांच्या छोटय़ा सुट्टीसाठी डब्यामध्ये नेण्याचा उत्तम पदार्थ.
 • गर्भिणी, स्तनदा माता, कृश व्यक्ती, रक्ताल्पता इत्यादीमध्ये विशेष उपयोगी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 2:51 am

Web Title: recipe bit barfi akp 94
Next Stories
1 मंडुकासन
2 कंपवात
3 ‘व्हर्टिगो’ची चक्कर
Just Now!
X