परदेशी पक्वान्न : नीलेश लिमये

युरोपला जाण्याची जशी वेगळी मजा आहे, तशीच तिथे खाण्याचीसुद्धा. म्हणजे पाहा..  एका छानशा रस्त्यालगत नीट नेटक्या टेबल-खुच्र्या मांडलेल्या असतील. प्रत्येक टेबलावर काटे-चमचे, ताज्या फुलांचा छोटासा गुच्छ आणि ताज्या मिळालेल्या भाज्यांनुसार बनवलेला मेन्यू कार्डवर वाट पाहात असेल. मग आपण एखादी कॉफी घ्यायची आणि सोबत ताज्या भाज्यांपासून बनवलेला एखादा पदार्थ. हा सगळा ऐवज म्हणजे एका रम्य संध्याकाळची खात्रीच जणू. अशाच एका मस्त संध्याकाळी युरोपात मला भेटलेला हा एक खास पदार्थ.

साहित्य

बडीशोपची अर्धी जुडी, १०० ग्रॅम पनी, १०० ग्रॅम मशरुम्स, १ चमचा वाटलेला लसूण, मीठ, मिरपूड, चिल्ली फ्लेक्स, तेल, व्हिनेगर, ५०मिली रेड वाईन.

कृती

पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करा. मशरुम स्वच्छ करून ब्लांच (ु’ंल्लूँ ) करून घ्या. बडीशेपची जुडी सोडवून पाने निवडून ती बर्फाच्या पाण्यात भिजत ठेवा.

तेल, व्हिनेगर, मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स एकत्र करून त्याचे मिश्रण पनीर आणि मशरुम्सना माखून घ्या. एका पसरट भांडय़ात हे सगळे ओतून परतून घ्या. त्यात वाईन घाला आणि २ मिनिटे आणखी परता. सगळी वाईन आटायला हवी. खायला देताना ताटलीत आधी मशरुम ठेवा त्यावर पनीर आणि वरून बडीशेपची पाने पेरा. बडीशेपची जुडी मिळाली नसेल किंवा आवडत नसेल तर शेपू वापरता येईल.

nilesh@chefneel.com