07 March 2021

News Flash

हुलग्याचे सूप

हुलगे- अर्धा वाटी ल्ल  तांदूळ- दोन चमचे

आरोग्यदायी आहार : – डॉ. सारिका सातव

साहित्य

 •   हुलगे- अर्धा वाटी ल्ल  तांदूळ- दोन चमचे
 •  जिरे, धने पावडर ल्ल अर्धा चमचा प्रत्येकी
 •  तूप- एक चमचा ल्ल  मीठ, तिखट- चवीप्रमाणे ल्ल कोथिंबीर- चिरून- एक चमचा

कृती

 •  हुलगे कढईमध्ये भाजून थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
 •  कढईमध्ये पाणी गरम करून तांदूळ व मीठ मिसळून उकळत ठेवावे.
 •  हुलग्याचे पीठ पाणी मिसळून ठेवावे.
 • कढईमध्ये तिखट घालून एक उकळी आल्यानंतर पाणी घालून केलेले हुलग्याचे पीठ त्यात मिसळावे.
 •  सारखे हलवत राहावे आणि १० ते १५ मिनिटे शिजू द्यावे.
 •  पातळपणा ठेवण्यासाठी पाणी मिसळू शकता.
 •  त्यानंतर तुपामध्ये जिरे व धने पावडरची फोडणी करून वरून मिसळावी.
 •  गरम गरम हुलग्याचे सूप पिण्यासाठी द्यावे.

वैशिष्टय़े

 •  सर्दी, पडसे, सायनस इत्यादीमध्ये अतिशय उपयुक्त.
 •  थंडीमध्ये घेण्यास उत्तम पदार्थ
 •  तोंडाला चव नसणे, ताप, भूक न लागणे, स्थौल्य इत्यादीमध्ये अतिशय उपयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:57 am

Web Title: recipe hulga sup akp 94
Next Stories
1 अर्धचंद्रासन
2 गुडघेदुखी
3 वाढत्या वजनावरील उपाय
Just Now!
X