02 June 2020

News Flash

अवाकाडो बटर मिल्क केक

.एका भांडय़ात बटर, अवाकाडो आणि साखर एकत्रित फेटा. छानपैकी एकजीव व्हायला हवे.

परदेशी पक्वान्न :  नीलेश लिमये

अवाकाडो मेक्सिकन फळ आहे पण आता आपल्या भारतात अगदी सर्रास मिळतं. त्याचा गर पौष्टिक समजला जातो.

साहित्य

१०० ग्राम बटर, १०० ग्राम साखर, २ अवाकाडोंचा गर, १५० ग्राम मैदा, १ चमचा बेकिंग पावडर, ५० मिली प्यायचा सोडा, १०० मिली ताक. आइसिंगसाठी – २ मोठे चमचे साखर अथवा किसलेला गूळ, अर्धी वाटी क्रीम, १ चमचा बटर

कृती

ओव्हन २०० तापवून घ्या. केक पात्राला थोडंसं बटर लावून घ्या आणि त्यावर मैदा शिंपडून घ्या. एका भांडय़ात बटर, अवाकाडो आणि साखर एकत्रित फेटा. छानपैकी एकजीव व्हायला हवे.

दुसऱ्या भांडय़ात मैदा, बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. त्यात सोडा आणि ताक मिसळून हे मिश्रण फेटलेल्या मिश्रणात मिसळा परंतु तसे करताना एकाच दिशेने ढवळत ढवळत हळूहळू हे मिसळा. मिश्रण जर सुके वाटत असेल तर आणखी थोडा सोडा वापरा. जास्त पातळ वाटत असेल तर ताक थोडे कमी करा अथवा २-३ चमचे मैदा वाढवा. आता हे मिश्रण केकपात्रात ओतून घ्या. तापवलेल्या ओव्हन मध्ये २०-२५ मिनिटे बेक करा. थोडंसं खरपूस भाजले जाण्यासाठी तापमान १८० ठेवून ५-७ मिनिटे अधिक बेक करा. केक बेक झाल्यानंतर काढून घ्या.

सजावटीसाठी – मंद आचेवर एका भांडय़ात गूळ वितळवून घ्या. त्यात बटर आणि क्रीम घाला. आच बंद करून भांडे खाली उतरवा आणि ढवळून घ्या. पुन्हा एकदा आचेवर ठेवून सगळं मिश्रण एकजीव करून घ्या. हा सॉस आपल्या केकवर ओतून, छानपैकी पसरून घ्या. केक खायला तयार आहे. nilesh@chefneel.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 1:52 am

Web Title: recipe in avocado akp 94
Next Stories
1 मुंबापुरीत बास्केटबॉलचा थरार
2 आकळलेले  गांधी..
3 कॉलेजच्या बाहेर जास्त धमाल!
Just Now!
X