|| रचना पाटील

साहित्य

१ किलो गावरान कोंबडा, अर्धी वाटी तीळ, अर्धा मोठा चमचा खसखस, ४ चमचा सुकं खोबरं किसलेलं, १ कांदा कापलेला, १ मोठा चमचा आलं-लसूण वाटण, २ चमचा मराठा गरम मसाला पूड, हळद, अर्धी वाटी तेल, ४ चमचा तिखट, १ वाटी दही, मीठ चवीनुसार.

कृती

गावरान चिकनला दही, हळद व मीठ लावून १ तास ठेवा. तीळ, खोबरं, खसखस भाजून घ्या. कांदा तळून घ्या. हे सर्व शक्यतो पाटय़ावर नाहीत मिक्सरवर वाटून घ्या. कढईत तेल टाकून वाटलेला मसाला व आलं-लसूण वाटण टाकून परता. त्यात गरम मसाला, तिखट, (१ तास ठेवलेलं) चिकन टाकून परता. गरम पाणी टाकून चिकन शिजू द्या. चवीनुसार मीठ टाका. शिजल्यावर कोथिंबीर टाका. (गावरान चिकन शिजायला साधारण ४०-४५ मिनिटे लागतात.)