टेस्टी टिफिन : शुभा प्रभू साटम

साहित्य

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
i Benefits Of Using Cast iron Utensils Does Food Turn Black in Iron Kadhai
लोखंडी कढई किंवा बिड्याचा तवा वापरून चव व आरोग्याला काय फायदे होतात? कशी घ्यावी काळजी?
  • १ वाटी कणिक अथवा मैदा
  • अर्धी वाटी गूळ
  •    पिकलेले केळ
  •   उकडलेला भोपळा
  •    स्वादासाठी वेलची
  •   जायफळ पूड
  •    खायचा सोडा
  •    तळण्यासाठी तेल.

कृती

गुलगुले हा भारतात विविध ठिकाणी होणारा एक सोप्पा गोड पदार्थ आहे. काही ठिकाणी पिठामध्ये गूळ घालून तो करतात तर काही ठिकाणी पाक करून केले जातात. आपण सोप्पा प्रकार पाहू. सगळ्यात आधी पाण्यात गूळ विरघळवून घ्यावा. त्यानंतर त्यात कणिक किंवा मैदा जे वापरणार असाल ते थोडं थोडं करत मिसळून घ्या. साधारण दह्य़ासारखे मिश्रण तयार करून घ्यावे. त्यात केळे, भोपळा हे कुस्करून घालावे. किंचित  सोडा घालावा. वेलची, जायफळ पूड घालून थोडावेळ झाकून ठेवावे.

तेल गरम करायला ठेवावे. चांगले कडकडीत गरम झाल्यावर त्यात हे मिश्रण चमच्या चमच्याने सोडून गुलगुले तळावेत. मंद आचेवर खरपूस तळलेले गुलगुले खायला एकदम झक्कास लागतात.