22 October 2019

News Flash

थ्रेडेड पनीर / चिकन

चिकन धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. पनीर असेल तर वेगळे धुण्याची आवश्यकता नाही.

टेस्टी टिफिन : शुभा प्रभू साटम

साहित्य;-पनीर अथवा बोनलेस चिकन, नूडल्स किंवा मॅगी, मैदा, तेल, मीठ,  आवडीचा कोणताही मसाला.

कृती-चिकन धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. पनीर असेल तर वेगळे धुण्याची आवश्यकता नाही. या तुकडय़ांना तुमच्या आवडीचा कोणताही मसाला जो घेतला असेल तो लावून घ्यावा. फार ओलसर करू नये. थोडेसे कोरडेच ठेवावे. साध्या नूडल्स किंवा मॅगी नूडल्स उकडवून घ्याव्यात. त्याला थोडासा मैदा लावून ते कोरडे करून घ्यावे. मैद्याऐवजी कॉर्नफ्लोअरही वापरता येईल. आता तेल कडकडीत गरम करून घ्यावे. पनीर किंवा चिकनचे मसाल्यात मुरवलेले तुकडे शिजवलेल्या नूडल्समध्ये लपेटून घ्यावेत. दोन्ही बाजूनी बंद करावे आणि ते तेलात तांबूस रंगावर तळून घ्यावे. तळण नको असल्यास श्ॉलो फ्रायही करता येईल.

First Published on September 20, 2019 2:04 am

Web Title: recipe in paneer chicken akp 94