परदेशी पक्वान्न : नीलेश लिमये
कुरकुरीत, क्रिस्पी, मसालेदार खाणं कुणाला आवडत नाही? अशाच एका खमंग पदार्थाची रेसिपी आज देत आहोत. ‘झुकिनी क्रिस्पस्’ आरोग्यदायी आहेत. आम्ही झुकिनी वापरली आहे. मात्र तुम्ही लाल भोपळा, सुरण यापैकी कोणतीही भाजी वापरू शकता.
साहित्य
- ३-४ झुकिनी
- १०० ग्रॅम
- पारमेसन चीझ
प्रोसेस्ड
- चीझ
- मिरपूड
- चिल्ली फ्लेक्स
- ओरेगॅनो
- १ अंडे
कृती
बटाटा चिप्ससारखे झुकिनीचे लांबट काप करून घ्या. एका भांडय़ात अंडे फेटून घ्या. दुसऱ्या भांडय़ात चिझ बारीक किसून घ्या. त्यातच ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मिरपूड टाकून हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. आता झुकिनीचे काप फेटलेल्या अंडय़ात चांगले घोळवून किसलेल्या चिझच्या मिश्रणात बुडवून त्याचा थर त्यावर चढू द्या.
हे चिप्स ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सियस तापमानात १५ मिनिटे बेक करा. हे चिप्स अतिशय खुसखुशीत होतात. एखाद्या चटणीसोबत ते सव्र्ह करा.
nilesh@chefneel.com
First Published on November 7, 2019 2:05 am