|| अलका फडणीस

साहित्य

मटण खिमा अर्धा किलो, कांदे दोन बारीक चिरलेले, मटणाचे वाटण दोन मोठे चमचे, मीठ चवीप्रमाणे, सी.के.पी. मसाला एक चमचा किंवा आवडत असल्यास जास्त, हळद अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, तमालपत्र एक, तेल पाव वाटी, तळलेला मसाला – एक चमचा, दही दोन चमचे.

कृती

खिमा स्वच्छ धुऊन त्याला मटणाचे वाटण, हळद, मीठ, सी.के.पी. मसाला आणि दही लावून तासभर ठेवा. पातेल्यात तेल गरम करून त्यावर हिंग, तमालपत्र आणि कांदा घालून परतून घ्या. त्यावर तळलेला मसाला आणि खिमा घालून परत छान परतून घ्या. पाणी सुटेल ते पूर्णपणे आटवा. नंतर पाणी घालून वर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून छान शिजवून घ्या. पावाबरोबर खिमा खूप छान लागतो.

टीप : हाच खिमा सुका करून खिम्याचे कानोले, खिमा पॅटिस, खिमा कोफ्ता करी, फ्लॉवर खिमा भाजी बनवता येते. सुका खिमा शेवळाच्या भाजीत घालून ती अतिशय चविष्ट होते.