|| अलका फडणीस

साहित्य

बासमती तांदूळ दोन पेले, कोलंबी दोन वाटे, हिरवे वाटण दोन मोठे चमचा, नारळाचे घट्ट दूध दोन वाटय़ा, कांदे – दोन बारीक चिरून, सी.के.पी. मसाला दीड चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीप्रमाणे, तेल अर्धी वाटी, तमालपत्र एक, हिंग पाव चमचा, तळलेला मसाला दोन चमचे, गरम मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर सजावटीसाठी.

कृती

दोरा काढून सोललेली कोलंबी चांगली धुऊन घ्या. तिला हळद, मीठ, तिखट, हिरवे वाटण लावून ठेवा. तांदूळ धुऊन त्याला हळद, तिखट, मीठ, थोडंसं हिरवे वाटण, गरम मसाला आणि तळलेला मसाला लावून ठेवा. जाड बुडाच्या भांडय़ात तेल गरम करा. त्यात हिंग आणि तमालपत्र घालून वर कांदा घालून परता. कांदा गुलाबी झाल्यावर कोलंबी घाला. नीट सवताळून घ्या. त्यावर तांदूळ घाला आणि हलक्या हाताने कोलंबीबरोबर परता. एक पेला पाणी आणि एक पेला नारळाचं दूध घालून भात शिजवून घ्या. साधारण भात शिजत आल्यावर त्यात उरलेला एक पेला नारळाचे दूध घाला. झाकण ठेवून चांगली दणदणीत वाफ आणा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आवडत असल्यास वाढताना वर ओलं खोबरं घाला.