|| रचना पाटील

साहित्य

१ किलो मटण, २ मोठा चमचा आलं-लसूण वाटण, १ वाटी दही, अर्धी वाटी तूप, २ मोठा चमचा काजू वाटून, १ मोठा चमचा टोमॅटो रस, १ चमचा धणे-जिरेपूड, २ मोठे चमचे लाल तिखट, २ मोठे चमचे कांदा पेस्ट, अर्धा चमचा हळद, ८-१० लवंगा, ५ दालचिनी तुकडे, ८-१० मिरी, ५ वेलदोडे, ४ तेजपत्ता, १५ काश्मिरी लाल मिर्च साबूत, पाणी, चिरलेली कोथिंबीर.

कृती

गरम पाण्यात लवंगा, दालचिनी, मिरी, वेलदोडे, तेजपत्ता, काश्मिरी लाल मिर्च साबूत टाकून एक उकळी येऊ द्या. थंड झाल्यावर पाणी काढून वरील पदार्थ पाटय़ावर वाटून घ्या. मटण स्वच्छ धुऊन त्याला हळद, मीठ, आलं-लसूण वाटण, टोमॅटोचा रस, लाल मिरची, धणे-जिरेपूड, दही व लाल मिरचीचे वरील वाटण लावून १ तास ठेवा. कढईत तूप गरम करा त्यात तळलेल्या कांद्याची पेस्ट, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा. मसाला चांगला परतल्यावर त्यात मटण टाकून १०-१५ मिनिटे चांगले परतून घ्या. पाणी टाका, मटण शिजल्यावर कोथिंबीर टाका.