|| रचना पाटील

साहित्य

अर्धा किलो पांढरी छोटी भरायची वांगी, अर्धी वाटी तेल, १ वाटी दाण्याचा कूट, ५ चमचे लाल तिखट, ३ चमचा मराठा गरम मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर सगळे साहित्य हाताने छान कालवून घ्या.

कृती

वांग्याला अर्धवट चार खाचा पाडा. नंतर त्यात एकत्र केलेला मसाला भरा. कढईत तेल टाकून घ्या. गरम झाल्यावर भरलेली वांगी टाकून त्यावर झाकण ठेवा. झाकणात थोडे पाणी ठेवा व वाफेवर वांगी शिजू द्या. मधनं मधनं चमच्याने अलगद वांगी फिरवा. वांगी शिजल्यावर गॅस बंद करा.