News Flash

लाल भोपळ्याचा हलवा

सगळ्यात आधी भोपळ्याची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा.

|| ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

पाऊण किलो लाल भोपळा (किंवा किसलेला अडीच कप भोपळा), २ चमचे साजूक तूप, दीड कप दूध, ३/४ कप खवा, ३/४ कप साखर, पाव चमचा वेलचीपूड, बदाम-काजू तुकडे, चारोळ्या, बेदाणे आवडीनुसार

कृती

सगळ्यात आधी भोपळ्याची साले काढून मध्यम किसणीवर किसून घ्यावा. यानंतर जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात हा किस घालावा आणि दोन-चार मिनिटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात दूध घालावे आणि पातेले झाकून मध्यम आचेवर शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे. दूध आटले आणि भोपळा नीट शिजला आहे की नाही ते पाहावे. लागल्यास थोडे दूध घालावे. गुठळ्या राहू न देता खवा व्यवस्थित बारीक करून घ्यावा आणि त्यात घालावा. खवा घातल्यावर थोडय़ा वेळानंतर साखर, वेलचीपूड, सुकामेवा घालावा आणि ढवळावे. आच मध्यमच ठेवावी. साखर वितळेल आणि हलवा घट्ट होईल. बऱ्यापैकी घट्ट झाले की गॅस बंद करावा. याच पद्धतीने दुधीभोपळ्याचा हलवाही करता येईल. हा हलवा थंडगारही छान लागतो आणि गरमागरमही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:23 am

Web Title: red pumpkin halwa
Next Stories
1 सावंतवाडी
2 भाज्यांच्या लागवडीचा क्रम
3 अंधांसाठी ‘स्मार्ट’ आधार
Just Now!
X