रेनो या भारतातील अग्रगण्य युरोपियन मोटार ब्रँडने नुकतीच त्यांची अत्याधुनिक नवी डस्टर सादर केली. भारतीय रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे आव्हान पेलण्याची तयारी असणाऱ्या नव्या डस्टरमध्ये २५ नव्या सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

‘‘रेनो ब्रँड भारतात अधिक वृद्धिंगत करणे हे आमचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. या दृष्टीने, आम्ही धोरणात्मक पद्धतीने आमची उत्पादन यादी अधिक बळकट करत आहोत. डस्टर हा आमच्या उत्पादन यादीतील महत्त्वाचा भाग आहे आणि या विभागातील व्यापक सुविधांमुळे ग्राहकांच्या गरजांना पूर्ण करणे आम्हाला शक्य झाले. भारतीय ग्राहकांमध्ये डस्टर लोकप्रिय होईल, असा आम्हाला विश्वास आहे,’’ असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कंट्री सीईओ वेंकटराम मामिलपल्ले म्हणाले.

दमदार

जागतिक दर्जाच्या स्टायलिंग वैशिष्टय़ांची जोड मिळालेल्या डिझाइनमुळे रेनो डस्टर भारतीय हवामान, परिस्थिती आणि ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांसाठी अगदी योग्य ठरते. नवे ट्राय-विंग फूल क्रोम ग्रिल, दमदार स्कीड प्लेट्स असलेले नव्या दुहेरी रंगातील फ्रंट बंपर, दमदार आणि रुंद हूडला अगदी साजेसे असे एलईडी डीआरएल असलेले नवे सिग्नेचर प्रोजेक्टर हेडलँप्स यामुळे ख्यातनाम नवी रेनो डस्टर अधिकच उठून दिसते. फ16 एव्हरेस्ट डायमंड कट अलॉय व्हील्समुळे ख्यातनाम डस्टरचे दमदार आणि वर्चस्ववादी रूप आणखीच खुलून येते. नव्या डस्टरमध्ये २०५ मिमी. असा उच्च ग्राऊंड क्लीअरन्स आहे, तर एडब्ल्यूडी या प्रकारात २१० मिमी.चा ग्राऊंड क्लीअरन्स आणि हाय अप्रोच आणि डीपार्चर अँगल्स असल्याने विविध परिस्थितींतील भारतीय रस्ते आणि ग्राहकांच्या बहुविध गरजा यात पूर्ण होतात. कायक रूफ रेल्स, गाडीच्या रंगांचे ओआरव्हीएम, मॅट ब्लॅक टेलगेट एम्बेलिशर आणि वॉटरफॉल एलईडी टेल लँप्स यामुळे या गाडीचा दमदार लुक अधिक उठून दिसतो. नव्या प्रकारात गाडीच्या बाह्य़ रंगांमध्ये ग्राहकांना दोन रंगांचा पर्याय देण्यात आला आहे – ‘कॅस्पियन ब्ल्यू’ आणि ‘महोगनी ब्राऊन’.

नव्या रेनो डस्टरच्या अंतर्गत भागात : सौंदर्यदृष्टी आणि आरामदायीपणा

नव्या डस्टरच्या अतुलनीय अनुभवाला जोड मिळाली आहे अत्यंत सौंदर्यपूर्ण आणि आरामदायी अंतर्गत सजावटीची. या सजावटीसाठी वापरलेल्या मिडनाइट ब्लॅक रंगामुळे डस्टरच्या केबिनला अगदी नवे रूप मिळाले आहे. प्रीमिअम ब्ल्यू ग्लेझ्ड सीट्समुळे सजावटीला एक क्लासिनेस प्राप्त झाला आहे, तर नव्या स्टाइलमध्ये घडवलेल्या रेनो स्टीअरिंग व्हीलचा स्पर्श अत्यंत मऊशार असा आहे. शिवाय यात कोणतेही साहस तुमच्यासाठी अगदी सहजसाध्य व्हावे यासाठी स्पीड लिमिटरसह क्रूझ कंट्रोलही देण्यात आले आहे. मऊ  स्पर्श असलेल्या डॅशबोर्डसह दुहेरी रंगातील सेंटर फेशिआ आणि डोअर ट्रिम्स यामुळे अंतर्गत सजावटीतील स्टायलिंगमध्ये भर पडते. शिवाय, या सौंदर्यपूर्ण सजावटीला मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्लेसह आइस ब्ल्यू ग्राफिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे, अत्यंत कठीण रस्त्यांवर गाडी चालवतानाही तुम्ही सतत अपडेटेड राहाल.

नव्या रेनो डस्टरच्या अंतर्गत सजावटीमध्ये कल्पनाशक्तीला व्यवहार्यतेची उत्कृष्ट जोड देण्यात आली आहे. पूर्णपणे एकात्मिक १७.६४ सेमी टचस्क्रीन मीडियाएनएव्ही इव्होल्यूशनमुळे या गाडीत बसण्याचा अनुभव अत्यंत सुंदर आणि गुंतवून ठेवणारा बनतो. या नव्या प्रणालीत अ‍ॅपलकारप्ले, अँड्रॉइड ऑटो, व्हॉइस रेकग्निशन आणि इको गाइड सुविधा आहेत. त्यामुळे, ही प्रणाली तुमची गाडी चालवण्याची पद्धत नियंत्रित करत त्यानुसार अधिक चांगला अनुभव मिळण्यासाठी मार्गदर्शनही करते. नव्या डस्टरमध्ये ४ स्पीकर्ससह अफङअटर प्रणाली आणि अधिक चांगल्या संगीतानुभवासाठी २ फ्रंट ट्विटर्स आहेत. नव्या रेनो डस्टरमध्ये पूर्णपणे स्वयंचलित क्लायमेट कंट्रोल प्रणाली आहे. यामुळे, केबिनमधील हवेचा गारवा आपोआप नियंत्रित केला जातो आणि गाडीत अधिकाधिक आरामदायी तापमान राखले जाण्याची खात्री केली जाते. कॉम्पॅक्ट तरीही प्रशस्त वाटावे अशा पद्धतीच्या आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्सची रचना अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या वस्तू ठेवता याव्यात यासाठी त्याचे डिझाइन नव्याने रचण्यात आले आहे.

डस्टरला रेनोच्या जगविख्यात इंजिन्सची ताकद लाभली आहे. १.५ लि. पेट्रोल आणि १.५ लि. डीसीआय डिझेल इंजिनमुळे या गाडीत अद्वितीय असा परफॉर्मन्स मिळतो. ही दोन्ही इंजिन्स रीस्पॉन्सिव्ह आणि इंधन सक्षम आहेत. पेट्रोल इंजिनमध्ये अतुलनीय अशी १०६ पीएस ऊर्जा आणि १४२ ठे कमाल टॉर्क मिळतो. शहरी रस्त्यांवर आणि आडवाटेवरही सहज प्रवासाचा अनुभव मिळावा या प्रकारे ही रचना करण्यात आली आहे. एक्स-टॉनिक सीव्हीटी गीअरशिफ्ट असलेले १.५ लि. पेट्रोल इंजिन सर्व प्रकारच्या रस्त्यांवर उत्तम मायलेजसोबतच उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. रेनो डस्टर पेट्रोल ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे.

नव्या रेनो डस्टरमध्ये प्रख्यात १.५ लि. डिझेल इंजिन आहे आणि यात दोन पॉवर आऊटपूटचा पर्याय आहे : २४५ ठे आणि २०० ठे सह अनुक्रमे ११० पीएस आणि ८५ पीएस. दमदार ११० पीएस प्रकारात इंजिनच्या आऊटपूटला साजेसे अशा गीअर रेशिओसह ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. त्यामुळे, सतत थांबत थांबत कराव्या लागणाऱ्या शहरातील वर्दळीच्या प्रवासातही रोजचा प्रवास आनंददायी होतो आणि महामार्गावर प्रवास करताना अत्यंत वेगाने जाणेही शक्य होते. ८५ पीएस प्रकारात स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवर सतत थांबत पुढे जात असतानाही प्रवास आरामदायी होतो आणि सर्वोत्कृष्ट इंधन क्षमता मिळते. अत्याधुनिक आणि अत्यंत सोयीस्कर एडब्ल्यूडी सुविधेमुळे ही गाडी कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर सहज धावते आणि गाडी चालवण्याचा तुमचा अनुभव अतिशय सहजसोपा होतो.

वैशिष्टय़े

* नव्या डस्टरच्या आकर्षक किमती ७,९९,९९० रुपयांपासून, पेट्रोल सीव्हीटी ९,९९,९९० रु., डिझेल एडब्ल्यूडी १२,४९,९९० रु.

*  रेनो डस्टरमध्ये १७.६४ सेमी टचस्क्रीन मीडियाएनएव्ही इव्होल्यूशन प्रणाली उपलब्ध अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, व्हॉइस रेकग्निशन आणि इको गाइड या सुविधा पेट्रोल सीव्हीटी, डिझेल एएमटी आणि डिझेल एडब्ल्यूडी असे पर्याय

* बाह्य़ रंगामध्ये कॅस्पियन ब्ल्यू आणि महोगनी ब्राऊन असे दोन पर्याय.

सुरक्षा वैशिष्टय़े

नवी रेनो डस्टर फ्रंट, साइड आणि पादचाऱ्यांसाठीच्या बीएनसीएपी नियमांना अनुसरून तयार करण्यात आली आहे आणि भारतीय सुरक्षा नियमांची यात पूर्तता करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशनसह (ईबीडी) अँटिलॉक-ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), चालक आणि प्रवाशांसाठी एअरबॅग्स, रीअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रीमाइंडर आणि स्पीड अलर्ट यांसारखी अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुरक्षा वैशिष्टय़े आहेत. ही सर्व वैशिष्टय़े नव्या रेनो डस्टरच्या सर्व व्हर्जन्समध्ये उपब्लध आहेत. रीव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) आणि हिल-स्टार्ट असिस्ट यामुळे डस्टरच्या एसयूव्ही क्षमता अधिक वृद्धिंगत होतात.

नव्या डस्टरमध्ये ३८ विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण अ‍ॅक्सेसरीज आहेत, ज्यामुळे या गाडीचे एसयूव्ही रूप अधिक उठून दिसते आणि प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर बनतो.

डस्टरच्या किमती (एक्स शोरूम)

मॉडेल किंमत रु.

आरएक्सई पेट्रोल                                        ७,९९,९९०

आरएक्सएस पेट्रोल                                  ९,१९,९९०

आरएक्सएस पर्याय पेट्रोल सीव्हीटी                ९,९९,९९०

आरएक्सई ८५ पीएस डिझेल                           ९,२९,९९०

आरएक्सएस ८५ पीएस डिझेल                         ९,९९,९९०

आरएक्सएस ११० पीएस डिझेल                        ११,१९,९९०

आरएक्सझेड ११० पीएस डिझेल                         १२,०९,९९०

आरएक्सझेड ११० पीएस डिझेल एएमटी        १२,४९,९९०

आरएक्सएस पर्याय ११० पीएस डिझेल एडब्ल्यूडी १२,४९,९९०