• तुम्ही ग्रुपबरोबर सहलीला जाणार असाल आणि सहल एखाद्या पर्यटन कंपनीने आयोजित केलेली असेल, तरीही तुम्ही तुमचा पर्यटनाचा कार्यक्रम काय आहे याचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. जेणेकरून तुम्हाला टूरवर त्याचा उपयोग होईल आणि लहान-मोठे अडथळे टाळता येतील.
  • खरेदी करताना कुठे घासाघीस करता येईल किंवा कुठे करता येणार नाही याची आधीच चौकशी करून घ्यावी. आपल्याआधी तिथे गेलेल्या मित्रांकडून किंवा टूर मॅनेजरकडून ही माहिती मिळवता येईल. परदेशातही अनेक ठिकाणी घासाघीस करून खरेदी करणे शक्य असते.
  • हॉटेल रूममध्ये असणारा बार हा वापरण्यासाठी असला तरी त्यातल्या किती गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत याची चौकशी करून घ्यावी. अन्यथा खर्चात भर पडू शकते.
  • प्रत्येक गोष्ट करताना वेळेवर काटेकोरपणे लक्ष ठेवायला हवे. परदेशात प्रत्येक शो हा वेळेवर सुरू होतो. एखाद्या ठिकाणी प्रवेशाची वेळ ठरलेलीच असते. त्यामुळे वेळेचे भान बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा एखादी चांगली संधी हुकू शकते.
  • परदेशात चोरीचे प्रमाण हे मोठे आहे. म्हणूनच परदेशात फिरताना ट्रॅव्हलर्स चेक हाताळणे हितावह ठरू शकते. आपल्या सामानाकडे नीट लक्ष द्यावे.
  • परदेशात स्थलदर्शन करताना पासपोर्ट जवळ असावा किंवा नसावा याची माहिती करून घ्यावी. काही ठिकाणी तुमचा पासपोर्ट दाखवावा लागतो.
  • थीम पार्कमध्ये गेल्यावर बाहेर येण्यासाठी अनेक मार्ग असतात, आपला ग्रुप कुठे भेटणार आहे, ती जागा नीट समजून घ्यावी. बऱ्याचदा संध्याकाळी निघताना गोंधळ होण्याची शक्यता असते.
  • लहान मुलांसाठी कुठल्या राइडस् आहेत याची माहिती आधीच घेतल्यास तिथे गेल्यावर गोंधळ उडत नाही.
  • ज्या ठिकाणी फिरणार आहात त्या ठिकाणाचा नकाशा कायम बरोबर ठेवा.