शेफ नीलेश लिमये nilesh@chefneel.com
साहित्य
* १ वाटी आदल्या दिवसाचा भात
* २ टेबलस्पून बारीक चिरलेला पातीचा कांदा * २ गाजर बारीक चिरलेले
* २ टेबलस्पून भाजके शेंगदाणे ल्ल २ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर * ५ ते ६ बसलीची पानं ल्ल १ टी स्पून भाजके तीळ
ड्रेसिंगकरिता
* २ टी स्पून शेंगदाणा तेल * १ टी स्पून लिंबाचा रस * १ टी स्पून चिंचेचे सॉस * १ टी स्पून चिल्ली फ्लेक्स * १ टी स्पून सोया सॉसल्ल १ इंच आल्याचे वाटण * चवीला मीठ आणि मिरपूड
कृती
शक्यतो या सॅलडसाठी आदल्या दिवशीचा भात वापरावा. बासमती असल्यास उत्तम. भात गरम केल्यानंतर तो परातीत काढून गार होऊ द्यावा. फ्रिजमध्ये ठेवून थंडगार भात वापरावा. वरील सर्व जिन्नस भातात मिसळावे. ड्रेसिंगचा साहित्य एका बाऊलमध्ये ढवळून घ्यावा आणि भातावर वाढावं. सॅलड थंड करून सव्र्ह करावे. सॅलड सकाळी ब्रेकफास्टसाठी वा रात्रीच्या जेवणात हलके जेवण म्हणून त्याचा आस्वाद घ्यावा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 23, 2018 5:18 am