रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

प्राणी पाळणे ही जशी जबाबदारी आहे. तसेच त्याला कायदे आणि नियमांचीही चौकट आहे. कायद्यांबाबतच्या अज्ञानातून ही चौकट सर्रास मोडली जाते. प्राण्यांबाबत सेवा पुरवणारे, विक्रेते यांच्यासाठी नियम आमचा काय संबंध असा गैरसमज पालकांमध्ये असतो. मात्र, काय पाळावे आणि काय टाळावे याचे नियम पालकांनाही बंधनकारक आहेत.

corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

प्राणी पालन, संवर्धन, संरक्षण यांबाबत प्राणी संरक्षण कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायदा हे प्रमुख कायदे आहेत. प्राणी संरक्षण कायद्याने पाळीव प्राण्यांना संरक्षण दिले आहे. प्राण्यांची खरेदी, विक्री, प्रजनन, निगा यांबाबत हा कायदा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा हा पाळीव प्राण्यांशी थेट संबंधित नाही. मात्र या कायद्याने संरक्षण दिलेले कोणतेही प्राणी पाळणे गुन्हा आहे.

गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढय़ा, कुत्री, मांजर, घोडे, स्थानिक गरजेनुसार काही भागांत उंट, पांढरे ससे, हॅमस्टर्स, कोंबडय़ा, पांढरी बदके, परदेशी पक्षी पाळता येतात. लव्हबर्डस, मकाव, कॉकिटेल यांसारखे परदेशी पक्षी पाळण्यासाठी परवानगी आहे. मात्र, त्यांचा पिंजरा, त्याचा आकार याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत ते पाळणे बंधनकारक असते. मात्र, परवानगी नसलेले पक्षी आणि प्राणी सर्रास विनापरवाना घरोघरी बाळगलेले दिसतात. पोपट, ससे, खारी, कासव ही त्याची हमखास आढळणारी उदाहरणे. कोंबडय़ा आणि पांढरी बदके (डोमेस्टिक गीझ) याखेरीज कोणत्याही भारतीय प्रजातीचे पक्षी पाळण्यासाठी आपल्याकडे बंदी आहे. गर्द हिरवा रंग, लालचुटूक चोच असलेला पोपट अनेक घरांमध्ये कौतुकाने शीळ घालताना दिसतो. मात्र तो पाळणे बेकायदा आहे. त्याचप्रमाणे मुनियादेखील पाळण्यास परवानगी नाही. आपल्याकडील कायद्यानुसार परदेशी पक्षी पाळण्यास परवानगी असली तरी ते पक्षी दुसऱ्या देशांमधून जंगलातून पकडून आणले जातात. याबाबतच्या जागतिक करारानुसार परदेशी पक्षी पाळण्यावरही निर्बंध आहेत. पाळलेल्या कुत्र्यांची नोंदणी करणे, दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे त्याबाबत उदासीनताच दिसून येते.भटक्या प्राण्यांच्याच नाही तर घरोघरी लाडाकोडात वाढलेल्या प्राण्यांवरून अनेक रहिवासी सोसायटय़ांच्या मासिक बैठका गाजतात. अनेकदा सोसायटय़ा प्राणी पाळण्यासाठी मनाई करतात. हौसेने हजारो रुपये खर्चून घरी आणलेल्या प्राण्यांचा त्रास होत असलेल्या तक्रारी पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. कायद्याची चौकट असली तरी त्यांची सामाजिक जबाबदारीही ओळखणे आवश्यक आहे.

हे ध्यानात घ्या..

’ जंगली ससे, खार, माकड, मोर, पोपट, मुनिया किंवा इतर कोणतेही जंगली प्राणी, पक्षी पाळणे बेकायदा आहे.

’ पाळीव प्राण्यांमध्येही मांसासाठी पाळले जाणारे प्राणी आणि सोबती म्हणून बाळगलेले प्राणी असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

’ पांढरे ससे, शेळ्या, मेंढय़ा यांचे मांस मिळविण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या या प्राण्यांना मारण्याची परवानगी आहे. मात्र कुत्री, मांजरे, पक्षी हे सोबती म्हणून पाळले जातात. त्यामुळे त्यांना मारणे हा गुन्हा आहे.

’ घरी पाळलेल्या कुत्र्यांची नियमानुसार नोंदणी करणेही आवश्यक आहे.

’ घरातील मत्स्यपेटीत ओटर, समुद्र कासवे आदी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण दिलेल्या प्राण्यांना ठेवणे वा त्यांचे प्रदर्शन भरवणे हा गुन्हा आहे.