सॅमसंगचा गॅलक्सी टॅब ए८

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या गॅलक्सी टॅब्लेट श्रेणीत ‘ए८’ या नवीन टॅबची भर घातली आहे. ५१०० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेल्या या टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन ४२९ चिपसेट प्रोसेसर देण्यात आले आहेत. यामध्ये दोन जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज उपलब्ध असून मेमरी कार्डच्या मदतीने ती ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात ८+२ मेगापिक्सेल क्षमतेचे कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. या टॅबसोबत यूटय़ूब प्रीमियम या अ‍ॅपची दोन महिन्यांची सेवा मोफत देण्यात आली आहे. हा टॅब दोन प्रकारांत उपलब्ध असून केवळ वायफाययुक्त टॅबची किंमत ९९९९ रुपये असून वायफाय+ एलटीई असलेल्या टॅबची किंमत ११९९९ रुपये इतकी आहे.

‘नोबेल स्किडो’चे एचडी रेडी टीव्ही

वीरा ग्रुपचा ब्रॅण्ड असलेल्या नोबेल स्किडो या कंपनीने कमी उत्पन्न श्रेणीतील ग्राहकांसाठी २४ आणि ३२ इंच आकारातील दोन एचडी रेडी टीव्ही बाजारात आणले आहेत. परवडणाऱ्या दरातील या टीव्हींमध्ये विविध सर्वोत्तम वैशिष्टय़ांसह सुलभ टीव्ही इंटरफेस आहे. अंतिम व्ह्य़ुइंग अनुभव देण्यासाठी हे टीव्ही उत्तमरीत्या डिझाइन करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. ए+ ग्रेड पॅनेल आणि १६ दशलक्ष रंगसंगतींसह एलईडी टीव्ही लाल, हिरवा व निळा रंगांमधील संपन्न रंगसंगतीचा अनुभव देतात. या टीव्हींमध्ये इंडियन सिनेमाचा झूम अनुभव घेता येतो. दोन १० वॅटचे शक्तिशाली साऊण्ड स्पीकर्स आहेत. हे स्पीकर्स उच्च दर्जाचा ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव देतात. या टीव्हींमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी १ एचडीएमआय पोर्ट आणि १ यूएसबी पोर्ट आहे, जे लॅपटॉप, गेमिंग कन्सोलशी जोडता येतात.

* किंमत : ६७९९ व ८४९९ रुपये (२४ व ३२ इंची अनुक्रमे)