सॅमसंग या भारतातील सर्वात मोठय़ा स्मार्टफोन ब्रॅण्डने आपल्या ‘एम३०एस’ या स्मार्टफोनच्या नव्या श्रेणीची घोषणा केली आहे. यामध्ये चार जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोअरेजची सुविधा आहे. या फोनमध्ये ६ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती ‘सी टाइप’ १५ वॉट चार्जरच्या मदतीने झटपट चार्ज करता येते. ६.४ इंचांचा फुल एचडी सुपर अमोल्ड इन्फिनिटी यू डिस्प्ले, ४८+८+५ मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा, १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, २.३ गिगाहार्ट्झचा ऑक्टाकोअर प्रोसेसर अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत.

’ किंमत : १४९९९ रुपये

‘इन्फिनिक्स’चा ‘एस५प्रो’

ट्रान्शियन होल्डिंगच्या इन्फिनिक्स या ब्रॅण्डचा ‘एस५प्रो’ हा नवीन स्मार्टफोन नुकताच भारतात सादर झाला. भारतातील सब १०के स्मार्टफोन श्रेणीत प्रथमच पॉप अप सेल्फी कॅमेरा सादर केला आहे. हे डिव्हाइस आधुनिक इन्फिनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम एक्सओएस ६.० डॉल्फिन ओएसवर चालते. तसेच अँड्रॉइड १० ही आउट ऑफ द बॉक्स सुविधाही प्रदान केली आहे. ६.५३ इंच आकाराचा फुल एचडी डिस्प्ले, १६ मेगापिक्सेलचा पॉपअप सेल्फी कॅमेरा, ४८ मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा, चार जीबी रॅम, ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशी वैशिष्टय़े पुरवण्यात आली आहेत.

’ किंमत : ९९९९ रुपये.

‘टेलिफुंकेन’चा स्मार्ट टीव्ही

जर्मनीचा ब्रॅण्ड असलेल्या टेलिफुंकेन या कंपनीने ३२ इंच आकारातील एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही ‘ळाङ32दर’ भारतात आणला आहे. हा टीव्ही अँड्रॉइड आठ ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असून त्याला क्वाड कोअर प्रोसेसर पुरवण्यात आला आहे. एक जीबी रॅम आणि आठ जीबी अंतर्गत स्टोअरेज असलेल्या या टीव्हीमध्ये अनेक ‘इनबिल्ट’ अ‍ॅप पुरवण्यात आले असून सात हजारहून अधिक चित्रपट मोफत पाहण्याची सुविधाही देण्यात आली आहे. या टीव्हीला २० वॉटचे सराऊंड स्पीकर असून वापरकर्ते आपल्या आवडीप्रमाणे ध्वनीचे नियोजन करू शकतात. याखेरीज दोन एचडीएमआय, दोन यूएसबी पोर्ट, एक ऑप्टिकल आऊटपूट या टीव्हीत पुरवण्यात आला आहे.

’ किंमत : ९९९० रुपये

रिअलमीचा स्मार्टफोन

रिअलमी या कंपनीने दोन नवीन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. रिअलमी ६ आणि रिअलमी ६ प्रो या दोन स्मार्टफोनमध्ये ९० एचझेड अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले, ६४ एमपी एआय क्वाड कॅमेरा, ३० वॉट फ्लॅश चार्ज आणि नवीन वैशिष्टय़ांसह अँड्रॉइड १०वर आधारित रिअलमी यूआय या सुविधा आहेत.

’ किंमत : १२९९९ रुपये