News Flash

‘स्क्रीन रेकॉर्डिग’ची क्लृप्ती

व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटपासून व्हिडीओ कॉलपर्यंत अनेक गोष्टींचे रेकॉर्डिग ‘स्क्रीन रेकॉर्डिग’च्या माध्यमातून सहज करता येते.

(संग्रहित छायाचित्र)

तुम्ही मोबाइलवर एखादा गेम खेळत आहात आणि अगदी सर्वोच्च गुण किंवा शेवटच्या ‘लेव्हल’ला पोहोचला आहात. अशा वेळी तो क्षण साठवून ठेवावा, अशी इच्छा होतेच. किंवा ऑफिसमधील एखाद्या सादरीकरणासाठी तुम्हाला व्हिडीओ फाइल करायची आहे. किंवा यूटय़ूबवरील एखादा व्हिडीओ तुम्हाला ‘रेकॉर्ड’ करायचा आहे. अशा वेळी ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ हा सर्वात सोपा आणि सहज पर्याय आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटपासून व्हिडीओ कॉलपर्यंत अनेक गोष्टींचे रेकॉर्डिग ‘स्क्रीन रेकॉर्डिग’च्या माध्यमातून सहज करता येते. सध्या ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ ही उपयुक्त गोष्ट ठरली आहे. मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर स्क्रीन रेकॉर्डिगची सुविधा देणारे अनेक अ‍ॅप किंवा सॉफ्टवेअर सध्या उपलब्ध आहेत. मात्र, विंडोज, अँड्रॉइड किंवा आयओएसवर ‘स्क्रीन रेकॉर्डिग’चे पर्याय उपलब्ध आहेत. अगदी इंटरनेट ब्राऊजरच्या मदतीने तुम्ही ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ करू शकता. ते कसे करायचे ते पाहू.

विंडोज संगणकावर..

‘विंडोज १०’मध्ये अंतर्भूत स्क्रीन रेकॉर्डर आहे. विंडोजमधील गेम रेकॉर्ड करण्यासाठी ती सुविधा निर्माण करण्यात आली आहे. ती सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम विंडोजमधील ‘एक्सबॉक्स’ हे अ‍ॅप सुरू करा. त्यानंतर कीबोर्डवरील ‘विंडोज’ (Windows)+ kGl’ ही बटणे दाबा आणि ‘येस, धीस इज अ गेम’ हा पर्याय निवडा.

त्यानंतर ‘स्टार्ट रेकॉर्डिग’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही ‘[Windows]+[Alt]+[R]’ ही कीबोर्डवरची बटणे दाबा. स्क्रीन रेकॉर्डिग सुरू होईल. ते थांबण्यासाठी वरचीच बटणे दाबा. तुम्ही केलेले स्क्रीन रेकॉर्डिग तुम्हाला ‘व्हिडीओज/कॅप्चर’ फोल्डरमध्ये दिसेल.

लक्षात ठेवा, विंडोज १० मधील स्क्रीन रेकॉर्डिगचा पर्याय निवडण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ‘व्हिडीओ कार्ड’ असणे आवश्यक आहे.

‘मॅक’वर..

अ‍ॅपलच्या ‘मॅक’ संगणकावर ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ करणे अधिक सोपे आहे. तुम्ही ‘मॅक’ ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असाल तर कीबोर्डवर ‘Shift+?+5’ ही बटणे एकत्रितपणे दाबताच स्क्रीनवर व्हिडीओ रेकॉर्डिगची सर्व बटणे दिसून येतील. या माध्यमातून तुम्ही संपूर्ण स्क्रीन, एखादा भाग किंवा एखादी विंडो रेकॉर्ड करू शकता. हे फुटेज तुम्हाला शेअर करण्याची सुविधाही ‘मॅक’वर आहे. मात्र तुमच्याकडे ‘मॅक’ची जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ‘क्वीकटाइम प्लेअर’च्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिग करता येईल.

‘अँड्रॉइड’वर..

‘अँड्रॉइड क्यू’ ही ऑपरेटिंग सिस्टीम सुरू होईल, तेव्हा त्यात ‘स्क्रीन रेकॉर्डिग’ची सुविधा आपोआप उपलब्ध होईल. तुम्ही ‘अँड्रॉइड क्यू’ची ‘बिटा’ आवृत्ती वापरत असाल तर ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘अबाऊट फोन’ हा पर्याय सुरू करा. त्यानंतर ‘व्हर्जन नंबर’वर सात वेळा क्लिक करा. त्यानंतर तुमचा ‘अनलॉक’ पासवर्ड टाइप करा. या माध्यमातून तुमचा फोन ‘डेव्हलपर मोड’मध्ये जाईल व तुम्हाला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील.

‘डेव्हलपर ऑप्शन्स’ या पर्यायामध्ये ‘फीचर फ्लॅग्ज’ हा पर्याय निवडला की तेथे ‘settings_screenrecord_long_press’ या पर्यायावर क्लिक करा आणि त्यासमोरचे बटण सुरू करा. आता तुम्ही केवळ पॉवर बटण दाबून स्क्रीन रेकॉर्डिग सुरू करू शकता.

तुमच्याकडे अँड्रॉइडची अद्ययावत आवृत्ती नसेल तर मात्र तुम्हाला प्ले स्टोअरवरून ‘स्क्रीन रेकॉर्डर’ अ‍ॅप डाऊनलोड करावे लागतील. असे अनेक अ‍ॅप तुम्हाला दिसतील. मात्र, या अ‍ॅपच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलमध्ये व्हायरस किंवा मॅलवेअर शिरण्याचा धोका संभवतो.

अँड्रॉइडवर तुम्हाला गेम रेकॉर्ड करण्याचा एक आणखी पर्याय उपलब्ध आहे. ‘गूगल प्ले गेम्स’मध्ये एक स्क्रीन रेकॉर्डर असून तुम्ही गेम खेळण्यास सुरुवात करताच तो आपोआप गेम रेकॉर्ड करण्यास सुरुवात करतो.

‘आयओएस’ वर

‘आयफोन’ किंवा ‘आयपॅड’वर स्क्रीन रेकॉर्डिग करणे सहज सोपे आहे. यासाठी तुम्हाला ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘कंट्रोल सेंट्रल’ गाठावे लागेल. त्यानंतर ‘कस्टमाइज्ड कंट्रोल्स’ हा पर्याय निवडून ‘स्क्रीन रेकॉर्डिग’च्या समोरील हिरव्या रंगाची खूण दाबा.

तुम्हाला ज्या अ‍ॅपचे रेकॉर्डिग करायचे आहे, ते सुरू करा. त्यानंतर स्क्रीनच्या बॉटमला पाहिल्यास तुम्हाला ‘रेकॉर्ड’चे चिन्ह दिसेल. त्यामध्ये तीन सेकंदांचे काऊंटडाऊन असते. रेकॉर्डिग थांबवण्यासाठी वेळ दर्शवणाऱ्या भागावर क्लिक करून ‘स्टॉप’वर क्लिक करा. मात्र, लक्षात ठेवा, रेकॉर्डिग होत असताना तुमच्या आयफोनवर आलेल्या नोटिफिकेशनही यात रेकॉर्ड होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2019 12:30 am

Web Title: screen recording application abn 97
Next Stories
1 घरातलं विज्ञान : तापमापी
2 टेस्टी टिफिन : सोप्पे ग्रिल चिकन आणि पिटा
3 ऑफ द फिल्ड : कसोटीतील जिगरबाज..
Just Now!
X