25 March 2019

News Flash

सेल्फीस  कारण की..

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे.

परभणी जिल्ह्य़ातील पूर्णा येथील आसेगावमधील छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दत्तक गाव धानोरा येथे श्रमदानातून विविध उपक्रम राबविले.

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर विनाकारण ‘सेल्फी’ काढण्याची हौस दिसून येते. मात्र, आता तुमच्या ‘सेल्फी’ काढण्याला आम्ही एक कारण देत आहोत. सत्कारण. रोजच्या दिनक्रमादरम्यान कोणतेही चांगले काम करताना तुमचा ‘सेल्फी’ काढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा. तुम्ही करत असलेले काम थोरच असावे, असे काही नाही. पण त्यातून तुमची सामाजिक बांधिलकी नक्कीच दिसावी. ‘सेल्फी’ पाठवताना त्याबाबत १०० शब्दांत माहितीही पाठवा. कदाचित तुमच्या सेल्फीचे हे ‘कारण’ उद्या आणखी काहींसाठी प्रेरणा ठरेल.

रविराज कुटे आणि त्याच्या मित्रमंडळींनी पुण्यातील ‘संध्या ओल्ड होम’ या वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांसोबत वेळ घालविला. गप्पा मारल्या आणि खाऊवाटप केले.

First Published on March 14, 2018 2:45 am

Web Title: selfies for a cause