11 July 2020

News Flash

योगस्नेह : सेतूबंधासन

जमिनीवर प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून शरीराच्या जवळ उभे करावेत

सेतूबंधासनकसे करावे?

* जमिनीवर प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून शरीराच्या जवळ उभे करावेत. दोन्ही पायांमध्ये साधारण खांद्याएवढे अंतर असावे.

*  दोन्ही हात शरीरालगत असावेत.

*  पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत पोट व कंबर वरती उचलावे.

*  श्वसन संथ सुरू ठेवावे. पाच दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या आसनस्थितीत राहिल्यानंतर, हळुवारपणे पुन्हा मूळ स्थितीत यावे.

फायदे

सेतुबंधासन या आसनामुळे पोटावरील तसेच मांडय़ांमधील अतिरिक्त चरबी कमी होते व स्नायूंना बळकटी येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराची लवचिकतेतही सुधारणा होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 3:42 am

Web Title: setubandhasan yoga
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : गाजर-लाल भोपळा सूप
2 कार एसीची काळजी
3 बाजारात नवे काय?
Just Now!
X