22 November 2019

News Flash

योगस्नेह : शलभासन

या आसनामुळे कंबर व नितंबाच्या स्नायूंना बळकटी येते

शलभ म्हणजे टोळ. टोळ नावाच्या कीटकाच्या शरीराची पुढची बाजू खाली आणि मागची बाजू वर असते. हे आसन करताना माणसाचे शरीरही याप्रमाणे दिसते, त्यामुळे या आसनाला शलभासन असे म्हणतात. या आसनामुळे कंबर व नितंबाच्या स्नायूंना बळकटी येते. पोटावर दाब येत असल्याने पोटाचेही आरोग्य सुधारते. कंबरदुखी दूर होते.

कृती :

* पालथे झोपून दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवावे.

* हात शरीराच्या बाजूस असावे. हाताची घट्ट मुठी केली तरी चालेल. हनुवटी जमिनीवर ठेवावी. डोके मात्र थोडे वर असेल.

* कंबरेचे आणि पाश्र्वभागाचे स्नायू आकुंचित करून त्याच्या बळावर दोन्ही पाय वर उचलावे.

* कंबरेचे आणि पाश्र्वभागाच्या स्नायूंचे आकुंचन अधिक वाढवून जमल्यास पाय अधिक वर न्यावे.

* पाय वर नेताचा शरीराचा तोल सांभाळावा.

First Published on June 25, 2019 5:01 am

Web Title: shalabhasana yoga the locust pose zws 70
Just Now!
X