|| रोहित अंबोस्ता

शेअर बाजारातील व्यापारविषयक समीकरणांमध्ये मानवाची भूमिका कोणीही नाकारू शकत नाही. शेअर बाजारातील दलाल आणि विश्लेषक मोठय़ा संख्येने असले तरी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानामुळे भांडवली बाजारातील व्यवहारांना कमालीची चपळता आणि सहजता लाभली आहे. भारतातील काही आघाडीचे मंच उपलब्ध तंत्रज्ञानाचा फायदा घेत एआय सक्षम रोबो सल्लागार, चॅटबोट्स इत्यादी उत्पादने विकसित करत आहेत. या उत्पादनांमुळे ही प्रक्रिया कमालीची वेगवान होत असून ही उत्पादने शेअर बाजारातील गुंतवणुकींना सुरक्षित ठेवण्यास आणि सर्वाना सहजपणे प्रवेश करता यावा, या दिशेने एकत्रितपणे योगदान देत आहेत.

भांडवली बाजारपेठेत यशस्वीरीत्या मजल मारण्याची गुरुकिल्ली म्हणजे डेटा आणि त्यातील खाचखळगा समजून घेणे. पण हेच मुद्दे गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरू शकतात. कारण कोणत्याही सामान्य माणसाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरील वर्तमान आणि इतिहासातील डेटाचा अभ्यास करणे कठीण आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे हा गुंता सोडविण्यास मदत झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक वित्तीय मंच गुंतवणुकीचे जग अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे.

गुंतवणुकीचे मार्ग सोपे करणाऱ्या या विविध मार्गाबद्दल

सोपी सुरुवात: भारतातील अग्रेसर वित्तीय संस्थांनी डीमॅट खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटाइज्ड केली आहे. यामुळे ब्रोकिंगचा अखंड अनुभव मिळून वापरकर्त्यांना ही प्रक्रिया अधिक सोपी व आकर्षक वाटते. तसेच वापरकर्त्यांना मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, ऑटोमेटेड केवायसी प्रमाणीकरण प्रणाली आणि ऑनबोर्डिग प्रक्रियेत पूर्णपणे डिजिटल क्लाएंट या नव्या युगातील सुविधाही मिळतात.

गुंतागुंतीचे ट्रेडिंग पॅटर्न सोपे करणे: ‘एआय’ आणि ‘बिग डेटा अ‍ॅनलिटिक्स’द्वारे ब्रोकिंग कंपन्या गुंतागुंतीचे ट्रेडिंग पॅटर्न्‍स अधिक सुलभ करत आहेत. मशीन लर्निग आणि बिग डेटा वापरून ग्राहकांना वैयक्तिक सेवा पुरविण्यासह अनुपालनाचे मूल्यांकन आणि रिअल टाइममधील जोखमींचे मूल्यांकन करणे शक्य झाले आहे.

सतत सोबत असणारा सहाय्यक: ज्याप्रमाणे ‘ओके गूगल’ तुम्हाला एखादा नंबर डायल करण्यास किंवा एखादे गाणे लावण्यास मदत करते त्याचप्रमाणे हे अ‍ॅप्स आर्थिक डेटा, संवाद किंवा नोट्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एवढेच नाही तर केवळ अ‍ॅपवरून एखाद्या ‘एआय बोट’शी संवाद साधून वापरकर्ते आपल्याला अपेक्षित गुंतवणूक व लाभ या दोन्हींबद्दल मार्गदर्शन घेऊ शकतात.

गुंतवणूक सल्ला मिळणे झाले सोपे : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तज्ज्ञांची सेवा कोणत्याही वेळी उपलब्ध असते ज्यामुळे एखाद्या ब्रोकरच्या मागे वाया जाणाऱ्या वेळेची बचत होते. गुंतागुंतीचा ‘एआय अल्गोरिदम’ सुरू असतानाच भरपूर डेटावर मंथन सुरू असते. यामुळे वित्तीय मंच एकाच वेळी अनेकांना रिअलटाइम सल्ला किंवा गुंतवणुकीचे समाधान देऊ शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, फोरकास्ट इंजिनने बाजाराच्या मानाकांना बिट करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. अशाप्रकारे सतत सोबत असलेल्या सहाय्यकामुळे गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणताना सुरक्षितता वाटते.

नूतनाविष्कारासाठी दरवाजे खुले:  वित्तीय मंचावर एआय शक्तीच्या इंजिनचा डेटा तयार करण्यासाठी डेटा वैज्ञानिक, मार्केटतज्ज्ञ, विश्लेषक आणि तंत्रज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांची मदत झाली आहे. विविध प्रकारची पाश्र्वभूमी लाभलेले लोक गुंतवणूक प्रवासात एकत्र येत असल्याने भांडवली बाजाराचे क्षेत्र आणि प्रगतीची दारे उघडली गेली आहेत.

भांडवली बाजाराच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रगती आता नवीन राहिली नाही. १९८०च्या मध्यापासूनच जगभरातील संशोधक आणि वैज्ञानिक वैयक्तिक तसेच समूहासाठी संगणकीकृत स्टॉक पीकर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात काही उच्चभ्रूंच्या वर्तुळातच हे प्रयत्न आकुंचित पावले. कारण अशा तंत्रज्ञानात ज्यांना पैसे गुंतवावे लागतात त्यांनाही सुविधा देण्यात आली. तथापि, देशातील काही ब्रोकरेज संस्थांनी तंत्रज्ञानातील उत्कृष्ट सुविधांचा लाभ घेत सामान्य लोकांसाठी या सेवा खुल्या केल्या आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यातील अडथळे दूर होत असून रिटेल इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स श्रेणीमध्ये प्रवेश करत आजच्या यूजर्सना सुरक्षित भविष्य आणि उच्च जीवनशैली मिळवण्याची खात्री देता येते.

(लेखक एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य माहिती अधिकारी आहेत.)