डॉ. नीलम रेडकर

ज्येष्ठ नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचा विकार खूप प्रमाणात आढळून येतो. उच्च रक्तदाब आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम नियंत्रित करणे सहज शक्य आहे. परंतु रुग्ण त्यांच्यावरील उपचारांकडे विशेष लक्ष देत नाहीत. बऱ्याच वेळा एकदा रक्तदाब नियंत्रित झाल्यावर रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार बंद करतात आणि त्यांचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. रक्तदाब नियमितपणे तपासणे ही आवश्यक बाब आहे आणि रक्तदाबाच्या प्रमाणानुसार औषधांचा डोस कमी-जास्त करणे हेही तितकेच गरजेचे आहे.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

उच्च रक्तदाबाचे प्रकार –

रक्तदाब म्हणजे शरीरातील धमण्यांच्या भिंतीवर रक्ताने निर्माण केलेला दाब. वरच्या दाबाला ‘सिस्टोलिक प्रेशर’ तर खालच्या दाबाला ‘डायस्टोलिक प्रेशर’ म्हणतात. सामान्यत: वरचा दाब हा १२० मिमी तर खालचा दाब ८० मिमी असतो. त्याहून जास्त १३९/८९ पर्यंतचा रक्तदाब ‘पूर्व उच्च रक्तदाब’ म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिक रक्तदाब ‘उच्च रक्तदाब’ म्हणून ओळखला जातो.

* प्रायमरी किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन – ९० टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबासाठी कुठलेही कारण आढळून येत नाही. त्याला प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतात.

* सेकंडरी हायपरटेन्शन – जेव्हा इतर विकारांमुळे रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब दिसून येतो, तेव्हा त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. किडनीचे आजार किंवा अंत:स्रावी ग्रंथींच्या आजारामध्ये सेकंडरी हायपरटेन्शन आढळून येते.

उच्च रक्तदाबाची कारणे

*  आनुवंशिकता

*  अतिमानसिक ताण

*  स्थूलपणा

*  व्यायामाचा अभाव

*  आधुनिक जीवनशैली

*  मूत्रपिंडामुळे जाणाऱ्या शुद्ध रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होणे.

*  मूत्रपिंडाचे विकार – क्रोनिक किडनी डिसीज

*  अंत:स्रावी ग्रंथींचे विकार

*  धूम्रपान, मद्यपान व मिठाचे अतिप्रमाणात सेवन.

उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम

उच्च रक्तदाबामुळे खालील गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात.

* अर्धागवायू – वाढलेल्या रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्राव होतो व मेंदूवर दाब निर्माण करतो. या दाबामुळे मेंदूचा जो भाग शरीरातील अवयवांचे नियंत्रण करतो, ते अवयव लुळे पडतात. त्यालाच अर्धागवायूचा झटका म्हणतात.

* हृदयरोग – उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींमध्ये हृदयाचे पंपिंग हळूहळू कमी होते आणि हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे हृदय बंद पडण्याचा धोका वाढतो.

सायलेंट किलर

उच्च रक्तदाबाची बऱ्याचदा कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत. उच्च रक्तदाब हा खूप काळ छुप्या स्वरूपात राहिल्यास हृदय, मूत्रपिंड आणि मेंदू या अवयवांवर वाईट परिणाम होतो. म्हणून त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते.

लक्षणे

* चक्कर येणे.

* डोळे दुखणे, जड वाटणे.

* दम लागणे.

* छातीत दुखणे.

* कामात लक्ष केंद्रित न होणे.

* नाकातून रक्तस्राव होणे.

* हातापायाला सूज

*  दृष्टिदोष, अंधूक दिसणे.