नीलेश लिमये

साहित्य

३-४ चिंबोऱ्या, ३ चमचे टोमॅटो केचप, २ चमचे मिरचीचे वाटण, १ कप व्हेजिटेबल स्टॉक, बारीक चिरलेली कांदा पात, २ चमचे आले-लसूण वाटलेले, मीठ, मिरपूड, तेल.

कृती :

चिंबोरी साफ करून घ्या. उकळत्या पाण्यातून साधारण ५-१० मिनिटे शिजवून घ्या. आता एका खोलगट तव्यावर तेल गरम करा. त्यात वाटलेले आले-लसूण घाला. हे परतल्यावर त्यात उकडलेल्या चिंबोऱ्या घाला. आता छान परतून घ्या. यावर मिरचीचे वाटण घाला. त्यानंतर टोमॅटो केचप घाला. पुन्हा हे सारे चांगले परतून घ्या. आता यामध्ये मीठ, मिरपूड घाला आणि सजावटीसाठी वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घाला.

सिंगापूरला मिळणारे हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. ज्यांना चिंबोरी आवडते आणि त्याचे वेगळे प्रकार करून पाहण्याची आवड आहे, त्यांनी ही पाककृती नक्की करून पाहा.