मानसी जोशी/भक्ती परब

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विविध राजकीय पक्ष त्यांच्या कामांची माहिती देणाऱ्या चित्रफिती फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी समाजमाध्यमांवर पसरवत आहेत. राजकारण्यांसाठी हा प्रचार असला तरी तरुण मुले-मुली या गोष्टींकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून बघतात. तरुण मुले तंत्रज्ञान सहजरीत्या हाताळतात आणि अधिक सर्जनशील असतात. लघुपट, मेम्स, घोषवाक्ये, जनसंपर्क  अशा कामांसाठी राजकीय पक्ष त्यांच्याकडून मदत घेतात. त्यासाठी आर्थिक मोबदला द्यायला तयार असतात. बदलत्या काळात निर्माण झालेली ही एक नवी संधी आहे, असे तरुणांना वाटते. गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत समाजमाध्यमांवर मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या तरुणांना कामे देत असल्याचे दिसत होते. मात्र या निवडणुकीत तरुण मुले समाजमाध्यमातील लोकप्रियतेच्या बळावर काम करताना दिसत आहे.

winning elections, elections,
निवडणुका जिंकण्याचे नवे मार्ग…
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…

एखाद्या पक्षाची विचारसरणी पटत नसेल तर काही तत्त्वनिष्ठ तरुण मंडळी त्यांच्या कामांना थेट नकार देतात, तर काही त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतात. कामापुरता संबंध ठेवतात. यामुळे कोणत्याही एका पक्षाशी बांधील न राहता एकाच वेळी विविध पक्षांची कामे करता येतात. एकाला काम मिळाले की, तो आपल्या काही मित्रमैत्रिणींना याबद्दल सांगतो. त्यांच्यापैकी एखाद्याकडे काही कला असेल तर ती व्यक्ती स्वत:हून मदतीसाठी पुढे येते. अशा प्रकारे एकमेकांना कामे मिळवून दिली जातात. काम जेवढं मोठं तेवढा रोजगार जास्त. एखादा लघुपट तयार करण्यासाठी कॅ मेरापर्सन, दिग्दर्शक, लेखक इत्यादींची गरज असते. यात बीएमएम, फिल्ममेकिंग, छायाचित्रण अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर असतो. यातून मिळणारा अनुभव पुढे व्यावसायिक स्तरावर काम करताना उपयोगी ठरतो. शिवाय एका चित्रफितीमागे साधारण ५ ते १० हजार मिळतात. काही वेळा विशिष्ट कालावधीसाठी करार केला जातो. त्याचा मोबदला मासिक ३० ते ३५ हजारांच्या घरात जातो.

एखादी जाहिरात करण्यासाठी संबंधित उमेदवाराच्या कामाची माहिती घेतली जाते. त्याच्या मतदारसंघात के लेल्या विकासकामांची पाहणी केली जाते. घराघरांत फिरून नागरिकांना प्रश्न विचारले जातात. एखाद्याने केलेली कामे सुमार असतील तरीही त्याचे उदात्तीकरण करून दाखवावे लागते. एखाद्या उमेदवारावर काही आरोप झाले असतील तर ते लोकोंनी विसरावे यासाठी प्रयत्न करावे लागतात. जनसंपर्क अधिकाऱ्यांमार्फतही उमेदवाराची प्रतिमा सुधारण्याचे काम केले जाते. महत्त्वाचे म्हणजे हे सगळे करत असताना त्यात भावनिकदृष्टय़ा गुंतून न राहता येत नाही.

गेले दोन महिने विविध पक्षांतील नेत्यांची गाजलेली भाषणे, गेल्या वर्षभरातील कार्यक्रमांतील निवडक गोष्टी यांचे उत्तम प्रकारे संकलन करून, एखादे लोकप्रिय गाणे लावून त्याच्या १ ते ३ मिनिटांच्या चित्रफिती तयार करण्यात येत आहेत; परंतु त्या पोस्ट करताना काळजी घ्यावी लागते, असे चित्रफिती संकलित करणाऱ्या सानत लडकत याने सांगितले. कारण निवडणूक आयोगाने समाजमाध्यमांवर करडी नजर ठेवली असून असा प्रचार करताना खूप कल्पकतापूर्वक जाहिराती कराव्या लागतात. नाही तर अशा जाहिराती अपलोड केलेली फे सबुक पेजेस, समाजमाध्यमांवरील अकाऊं ट्सवर बंदी घातली जाते. त्यामुळे थेट जाहिराती न करता विनोदी चित्रफिती केल्या जातात.

नवोदित कलाकारांनाही राजकीय जाहिरातींतून संधी मिळते. या कामांचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करता येतो. शिकण्यास वाव मिळतो.

शिवसेनेसाठी जाहिरात

तीन वर्षांपासून मी महाविद्यालयाच्या एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेत आहे. सीएचएम महाविद्यालयात शिकत असताना ‘भाव अपूर्ण श्रद्धांजली’ हे नाटक के ले होते. त्यांच्या दिग्दर्शकाने मला एका ऑडिशनसाठी बोलावले. लगेच दुसऱ्या दिवशी जाहिरातीसाठी निवड झाली असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकीत मत देण्याचे आवाहन करणारी ती जाहिरात होती.

– वैष्णवी आंबवणे

लोककलांचा वापर

प्रचारासाठी विविध राजकीय पक्ष लोककलांचा वापर करताना दिसत आहेत. पोवाडा, पथनाटय़, वासुदेव, मुकाभिनय आणि आबूराव बाबूराव यांसारख्या लोककलांचा वापर करण्यात येतो. लोककला लुप्त होत चालल्याने हे प्रकार लोकांना पाहण्यास मिळतात. त्यामुळे लोकांना त्याचे अप्रूप असते. यामध्ये प्रचारात राजकीय पक्ष आणि नेत्याविषयी माहिती रंजक पद्धतीने मांडण्यात येते, असे नीलेश अडसूळ याने सांगितले.

नेत्यांच्या कामांची तपासणी होते

दृक्श्राव्य माध्यम हे प्रभावी माध्यम आहे. निरक्षर माणूससुद्धा पाहू शकतो. नागरिकांचे मत बदलण्याची ताकद या माध्यमामध्ये आहे. नेत्याची कामे करताना काही गोष्टी तपासल्या जातात. तो खरंच लोकांसाठी काम करत आहे का याकडे लक्ष दिले जाते, असे दिग्दर्शक, संकलक महेश लिमये याने स्पष्ट केले.

मेम्सचे राजकारण

निवडणुकीच्या काळात प्रचाराचे, विरोधी पक्षांवर टिप्पणी करण्यासाठी नवनवीन फंडे शोधून काढले जातात. आजच्या काळात सद्य:स्थितीवर मार्मिक विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या मेम्सची चलती आहे. राहुल गांधी, नरेंद्र मोदी यासह स्थानिक राजकारण हे या मेम्सचे आवडते विषय सध्या फे सबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर जास्त गाजत असल्याचे चित्र आहे. या माध्यमातून चालू घडामोडींवर उपरोधिकपणे बोलले जाते.

‘मनमोहन सिंग यांचे छायाचित्रावर आता बोलू शकत नाही व्हॉट्सअप करा’

‘५ वर्षांचे चॅलेंज यूपीए सरकारचे २०१४ मध्ये ९ घोटाळे बाहेर आले; परंतु बीजेपी सरकारचा सब का विकास’

‘५ वर्षांत ग्रामीण स्वच्छता कव्हरेज २०१४ मध्ये ३८ टक्क्यांवरून २०१८ मध्ये ९५ टक्क्यांपर्यंत’

‘मोदींविरोधात एकत्र येणारे अखिलेश यादव, मायावती, लालू यादव, ममता आणि केजरीवाल, तसेच मोदींना पाठिंबा देणारे बिल गेट्स, जागतिक बँकेचे संचालक, नारायण मूर्ती, फिलीप कॉटलर’

गली गली मे शोर है चौकीदार चोर है’

‘तो सुबोध मी बाळबोध’

‘आम आदमी, आम औरत’

‘हो मी आहे मोदीभक्त’

यांसारखे मेम्स नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय बनलेले आहेत.