सोफासेट बैठकीच्या खोलीची शान वाढवतात. मात्र धुळीमुळे आणि उन्हामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची देखभाल करणे खूप आवश्यक आहे.

* सोफा सेटमध्ये मुख्यत: कापडी (कॉटन) आणि चामडी (लेदर) सोफासेट हे दोन प्रकार असतात. लेदरच्या सोफासेटचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. लेदर सोफासेट शक्यतो खिडकीजवळ ठेवू नका. कारण खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या माऱ्यामुळे ते खराब होऊ शकते.

* व्हॅक्यूम क्लीनअरचा वापर सोफासेटची सफाई करण्यासाठी करा. तत्पूर्वी सोफ्यावरील सर्व गाद्या, उश्या काढून ठेवा.

* दिवसातून एकदा तरी सोफ्यावरील गाद्या काढून त्यावरील धूळ, कचरा झटका.

* सोफ्यावर एखादा डाग पडला असेल तर ओल्या कपडय़ाने तो पुसा. मात्र रासायनिक पदार्थाचा वापर करू नका. त्यामुळे सोफा खराब होऊ शकतो.

* टोकदार आणि धारदार वस्तू शक्यतो सोफ्यावर ठेवू नका. त्यामुळे सोफ्याचे कापड फाटू शकते.

* सोफ्याचा वापर केवळ बसण्यासाठी करा. अन्य जड वस्तू सोफ्यावर ठेवू नका.