News Flash

सांगे वाटाडय़ा : भटकंतीत बुजरेपणा सोडून द्या

‘नाइट पार्टीज्’मध्ये रमण्यापेक्षा सकाळी भटकंतीला लवकर सुरुवात केलीत, तर बरेच उत्तम पाहून होऊ शकते आणि ते सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपयोगी ठरते.

  • ‘सोलो ट्रॅव्हल’ करतेवेळी तुमच्या दिवसाची सुरुवात लवकर करा. ‘नाइट पार्टीज्’मध्ये रमण्यापेक्षा सकाळी भटकंतीला लवकर सुरुवात केलीत, तर बरेच उत्तम पाहून होऊ शकते आणि ते सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपयोगी ठरते.
  • सोलो ट्रॅव्हल करतेवेळी बुजरेपणा सोडून द्या. आपणहून स्थानिकांशी बोला, त्यांच्याकडून त्या त्या जागेबद्दल, प्रथा परंपरांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • सोलो ट्रॅव्हलचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या मनमर्जीप्रमाणे भटकंती करू शकता. तुम्ही कलेचे चाहते असाल तर एक संपूर्ण दिवस तुम्ही म्युझियममध्ये घालवू शकता किंवा पायी शहर भटकंती करू शकता.
  • सोलो ट्रॅव्हल करतेवेळी चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे गोंधळलेले भाव नसावेत. जरी तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी हसतमुख चेहऱ्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही स्थानिक दुकानदारांशी बोलून अधिक माहिती घ्यावी.
  • खूप सारी ज्वेलरी वा इतर आकर्षक भडक रंगाचे कपडे, महागडे इलेट्रॉनिक गॅजेट्स, कॅमेऱ्याचा शो-ऑफ टाळावा. थोडक्यात तेथील स्थानिकांप्रमाणे तुम्ही राहण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न करा.
  • सोलो ट्रॅव्हल करताना एक अत्यावश्यक आणि उपयोगी गोष्ट म्हणजे जिथे जाणार असाल तेथील जुजबी शब्द शिकून घ्या. खरेदी करतेवेळी, मदत मागतेवेळी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकेल.      क्रमश:

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 12:18 am

Web Title: solo travel tips
Next Stories
1 फेकन्युज : ‘फोटोशॉप्ड्’ ट्वीट मेवानींच्या अंगलट
2 फेकन्युज : ‘निपा’वर जेलसेमियम-२०० हा उपाय नाही..
3 ‘जीडीपीआर’चे कवच
Just Now!
X