सामग्री :
* सोया ग्रॅन्युल्स- २५ ग्रॅम
* एक मोठा कांदा, एक टोमॅटो
* एक वाटी चिरलेल्या भाज्या- गाजर, वाटाणा, कोबी, प्लावर, शिमला मिरची.
* एक हिरवी मिरची.
* फोडणीचे साहित्य-तेल, जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, हिंग, धने पावडर.
* कोथिंबीर-अर्धा वाटी चिरलेली. चवीपुरते मीठ.
कृती :
* सोया ग्रॅन्युल्स पाणी टाकून भिजत ठेवावे. (१० मिनिटे)
* त्यानंतर पाणी काढून टाकावे.
* कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घ्यावी.
* कमी तेलामध्ये फोडणी देऊन कांदा, टोमॅटो चांगले परतून घ्यावे.
* कांदा, गुलाबी झाल्यानंतर इतर भाज्या टाकून शिजवावे.
* शेवटी मिरची टाकावी.
* भिजवलेले सोया ग्रॅन्युल्स यात टाकून व्यवस्थित हलवावे.
* चीवपुरते मीठ टाकावे.
* कोथिंबीर टाकून खाण्यासाठी द्यावे.
विशेषत:
* प्रथिने, ब जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात.
* कबरेदकांचे प्रमाण कमी.
* वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह, हृदयविकार या विकारांवर उपयुक्त.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 2:27 am