News Flash

मनालीतील सोयाबीन चाप, मीट चावल

तुकडा तांदळाच्या भाताला स्वत:चा असा स्वाद असतो. हे ठिकाण खिशाला अगदी परवडणारं आहे.

मनालीतील सोयाबीन चाप, मीट चावल
(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

मनाली हे सर्वच भारतीयांचं आवडतं पर्यटनस्थळ. सरत्या हिवाळ्यात काही प्रमाणात बर्फाच्छादित डोंगर आणि मानवणाऱ्या थंडीचा आनंद घेता येत असल्यामुळे मार्चपासूनच पर्यटकांची गर्दी होते. संपूर्ण भारतातून पर्यटक येत असल्यामुळे बहुतांश सर्वच प्रकारचे खाद्यपदार्थ इथे मिळतात. अगदी दाक्षिण्यातदेखील. त्यामुळे स्थानिक पदार्थाचा आस्वाद घ्यायचा तर जरा भटकावं लागेल. मोमो, थुक्पा हे खास हिमाचली पदार्थ सहज मिळतात पण हिमाचलचा अस्सल मीट-चावल खायचा तर मनाली एसटी स्टँडजवळ ‘लोकल क्राफ्ट मार्केट’ असा फलक असणारं एक बैठं संकुल आहे. त्याच्या खबदाडीत एक अगदी छोटं आणि साधं कांगडी धाम म्हणून हॉटेल आहे. गरमागरम भात, मटणाचे चार तुकडे आणि रस्सा. अगदी साधा बेत. तिखटही नाही आणि अगदीच सपकदेखील नाही. तुकडा तांदळाच्या भाताला स्वत:चा असा स्वाद असतो. हे ठिकाण खिशाला अगदी परवडणारं आहे.

नेहमीपेक्षा वेगळा असा आणखी एक प्रकार म्हणजे सोयाबीन चाप. शीग कबाब टांगतात तसे हे सोयाबीन चाप काचेच्या आड टांगलेले असतात. सोयाबीनचं पीठ आणि मैदा एकत्र करून ते शीगवर लावलेलं असतं. नंतर तंदूरमध्ये हे मिश्रण भाजलं जातं. थोडं खरपूस करून त्यावर वेगवेगळे मसाले टाकून गरमागरम खाण्याची मजा औरच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 1:55 am

Web Title: soyabean arc meat rice in manali
Next Stories
1 शहरशेती : कढीपत्ता
2 टेस्टी टिफिन : नाचणीचे धपाटे
3 कृत्रिम प्रज्ञेचं वर्ष
Just Now!
X