ज्योती चौधरी-मलिक

साहित्य :

दोन कांदे, दोन वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, ओवा, कोथिंबीर, मीठ, अर्धा चमचा भंडारी मसाला.

कृती :

कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घ्या. त्यात सर्व मसाले, पीठ आणि मीठ एकत्र करा. मिश्रणाचा गोळा करून घ्या. तव्यावर तेल टाकून त्यावर त्या गोळ्याच्या वडय़ा थापा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.