|| डॉ. सारिका सातव

साहित्य

  • गव्हाचे पीठ (२ वाटय़ा)
  • चिरलेला पालक (१ वाटी),
  • डाळीचे पीठ (१ वाटी),
  • बारीक चिरलेले पनीर (अर्धी वाटी)
  • गाजर
  • कोबी
  • फ्लॉवर
  • सिमला मिरची
  • वाटाणा (२ वाटय़ा)
  • ओवा (२ चमचे)
  • लिंबाचा रस (अर्धा चमचा)
  • जिरे (१ चमचा)
  • मसाले (चवीपुरते)
  • मीठ (चवीपुरते)
  • कोथिंबीर (अर्धी वाटी.)

कृती :

  • गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, चिरलेला पालक, ओवा एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
  • सर्व भाज्या फोडणी आणि मसाले घालून वाफवून घ्याव्यात. शेवटी लिंबाचा रस मिसळावा.
  • नंतर पनीर मिसळून एक वाफ द्यावी.
  • पिठाचे छोटे फुलके तयार करून घ्यावेत.
  • फुलके भाजून होत आल्यानंतर तयार भाजी मधोमध सरळ रेषेत घालावी आणि रोल करावा.
  • रोल थोडा वेळ तव्यावर तसाच ठेवावा.

वैशिष्टय़े :

  • डब्यात नेण्यासाठी उत्तम पदार्थ. ल्ल भरपूर प्रमाणात भाज्या वापरल्या जातात. ल्ल  भरपूर जीवनसत्त्वे (अ, ब, क), प्रथिने आणि तंतुमय पदार्थ मिळतात.  ल्ल मधुमेह, हृदयविकार, मलबद्धता, स्थूलता इत्यादी आजार असणाऱ्यांसाठी उत्तम.ल्ल सर्व वयोगटांसाठी चांगला पदार्थ.