07 December 2019

News Flash

अर्धमत्स्येन्द्रासन

पाठ आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आसन आहे.

पाठ आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आसन आहे. या आसनामुळे पाठीच्या हाडांबरोबर तिथल्या नसांनाही चांगला व्यायाम मिळतो. पाठ, पोट यांबरोबरच पाय, मान, हात, कंबर, छाती येथे चांगला ताण बसत असल्याने येथील रक्ताभिसरण सुधारते.

कसे करावे?

  • जमिनीवर सतरंजी किंवा चटई अंथरून बसा.
  • दोन पाय सरळ पुढे करा. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. पावले वरच्या दिशेला असावी.
  •  सर्वात आधी उजवा पाय गुडघ्यात वाकवा. दोन्ही हातांची बोटे गुंफून गुडघ्याच्या खालच्या भागाला धरून ठेवावे.
  •  श्वास घेऊन हा पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. पायाच्या बोटांना बाहेरच्या बाजूंनी ताण द्या. त्यामुळे गुडघ्याच्या स्नायूमध्येही तणाव निर्माण होईल.
  •  हे करताना पायाची टाच जमिनीच्या थोडी वरील बाजूस ठेवा.
  •  काही वेळाने डाव्या पायाने हे आसन करू शकता.

First Published on November 5, 2019 3:18 am

Web Title: strengthen the back muscles akp 94
Just Now!
X