27 November 2020

News Flash

खाद्यवारसा : भरली वांगी

भाकरीवर मस्त तीळ वगैरे पेरून तेल-तिखटासोबत ही भाजी मनसोक्त ओरपा.

साहित्य : ५ ते ६ काटेरी गोल वांगी. २ वाटय़ा सोललेले वालपापडीचे दाणे (पावटा), २ वाटय़ा हिरव्या पातीचा कांदा चिरलेला, १ वाटी खवलेला ओला नारळ, १ टोमॅटो बारीक चिरून, एक चमचा मोहरी, जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा धनेजिरे पूड, २ चमचे मिरचीपूड, १ चमचा गरम मसाला, ३ चमचे तेल, मीठ, चवीनुसार बोराएवढा गुळ

कृती

वांग्याचे देठ काढून चार चिरा द्या. जाड कढईत तेलावर मोहरी आणि जिरे टाका. त्यावर हिंग टाका. त्यावर मग टोमॅटो- आलंलसूण घालून परता. त्यावर पातीचा कांदा व सर्व सुके मसाले घालून परतून घ्या. त्यावर वालाचे दाणे आणि खवलेला नारळ घालून एक वाफ काढून घ्या. मीठ आणि गूळ घाला. हे मिश्रण वांग्यात भरून वांगी झाकून शिजवा. ही भरली वांगी गरमागरम भाकरीसोबत खा. सध्या थंडीची लाट परत आलेली आहे. त्यामुळे भाकरीवर मस्त तीळ वगैरे पेरून तेल-तिखटासोबत ही भाजी मनसोक्त ओरपा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 2:08 am

Web Title: stuffed eggplant
Next Stories
1 सांगे वाटाडय़ा : पूर्वाभ्यास गरजेचा
2 सवलतींपासून सावधान!
3 न्यारी न्याहारी : दही सँडविच
Just Now!
X