25 September 2020

News Flash

चलती का नाम.. : फिरण्याची ‘स्टाइल स्टेटमेंट’

यूनिसेक्स फॅशनमध्ये आता रिव्हर्स हॅट्सही मोठय़ा संख्येने उपलब्ध आहेत.

गायत्री हसबनीस

फिरणं हे आजच्या पिढीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे त्यासाठी चपखल अशी स्टाइल स्टेटमेंट अंगीकारणंही आलंच.

जानेवारीच्या वीकेण्डला आणि इतर वेळीही कॅम्प फायर, ट्रेक आणि ट्रिप या गोष्टी येतातच. तरुणाई उत्सुक असतेच त्यासाठी. डिसेंबरप्रमाणे या महिनाअखेपर्यंत तरी हॉलिडेजचं प्लॅनिंग सुरूच असतं. परदेशी वा राजस्थान, हिमालयासारख्या ठिकाणी फिरणं सुरूच असतं. मुंबईतही ‘साइटसीइंग’ला जाणंही होतं. यासाठी आपलं रूटीन ठरवताना तरुण पिढी आपल्या फॅशनकडेही तितक्याच तत्परतेने पाहते. फिरणं हे आजच्या पिढीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे त्यासाठी चपखल अशी स्टाइल स्टेटमेंट अंगीकारणंही आलंच. यंदाची मुलंमुली खूप सटल वा लाइट रंगांच्या फॅशनकडे भर देतात आणि त्यासोबत अधिक उठावदार दिसणारे अ‍ॅक्सेसरीज वापरतात. या अ‍ॅक्सेसरीजमध्ये बॅग्ज, हॅट्स आणि शूजचा समावेश असतो. कुठेही फिरायला जायचे म्हटल्यास या तीन गोष्टींचा विचार जास्त करून केला जातो.

हॅट्समध्ये मोनोटोनस फॅशन याआधी पाहायला मिळाली होती, पण आता त्यांच्यात बऱ्यापैकी वैविध्य आलं आहे. हल्लीच्या मुली लोकल ट्रेनमधून प्रवास करताना, ‘स्ट्रीट शॉपिंग’ करताना आणि इतरत्र सबर्बसारख्या ठिकाणी फिरताना लहानसहान हॅट्स ज्या दिसायला अगदी ‘क्यूट’ असतात त्या हमखास वापरतात. ज्या खासकरून हॅण्डमेड वा खादीच्या असतात. हल्ली छोटय़ामोठय़ा प्रदर्शनांतही अशा हॅट्स स्वस्त दरात उपलब्ध असतात. वूलनच्या हॅट्सचा वापर कमी होत आहे आणि त्यांची किंमतही थोडय़ा अधिक प्रमाणात वाढली आहे. आता फ्लोपी हॅट्सचा ट्रेण्ड आलाय. ज्यात पोनी, लेस, बटण्सची फॅन्सी फॅशन आहे. पार्टीवेअर म्हणून या हॅट्स विशेषत: ओळखल्या जातात. यांचे आकार लहान-मोठे दोन्ही प्रकारचे असते. ‘सोशल मीडिया’वरून ते ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून यांची खरेदी होत असते. मुलांमध्ये प्रामुख्याने कॅप्स आणि हॅट्स दोहोंची क्रेझ असते. मुलांना मुख्यत: ब्रॅण्डेड कॅप्सच जास्त आवडतात आणि जास्त प्रमाणात त्या ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहेत. सध्या मुलांमध्ये बेसबॉल हॅट्स, काऊबॉय हॅट्स आणि फ्लॅट बेज हॅट्सची क्रेझ जास्त आहे. असे हॅट्स हे मूलांकडून कॉलेज पार्टी, फेस्टिव्हल आणि गॅदरिंगलाही घातले जातात.

यूनिसेक्स फॅशनमध्ये आता रिव्हर्स हॅट्सही मोठय़ा संख्येने उपलब्ध आहेत. शूज आणि बॅग्ज् या दोन्ही गोष्टी यादरम्यान खरेदीच्या टॉप ‘मस्ट लिस्ट’पैकी असतात. हल्ली लेदरच्या शूजची क्रेझ मुलांमुलींमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यात येऊ  घातलेल्या विविध शेड्स सगळ्यांना आवडतात. मरून, ब्लॅक आणि ब्राऊन रंगांप्रमाणेच येल्लो, पिंक, ऑरेंज, गोल्डन असे रंगही आजकालच्या मुलींना आणि मुलांना आवडतात. लेदरमध्ये अ‍ॅन्कल बूट, झीपर बूट आणि लेस्ड शूज्स वूमन्सवेअर आणि मेन्सवेअर दोघांमध्ये आहे. मुली सॅन्डल हिल्स जास्त अजमावतात तर मुलांना लेदरचे ‘स्लिप ऑन’ जास्त रुचतात. फॉर्मल शूज आणि कॅनव्हास शूजमध्येही बरीच आकर्षकता आहे.

‘फेस्टिव्हल’साठी पसंती

सोशल मीडिया’वरून ते ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून यांची खरेदी होत असते. मुलांमध्ये प्रामुख्याने कॅप्स आणि हॅट्स दोहोंची क्रेझ असते. मुलांना मुख्यत: ब्रॅण्डेड कॅप्सच जास्त आवडतात आणि जास्त प्रमाणात त्या ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहेत. सध्या मुलांमध्ये बेसबॉल हॅट्स, काऊबॉय हॅट्स आणि फ्लॅट बेज हॅट्सची क्रेझ जास्त आहे. असे हॅट्स हे मुलांकडून कॉलेज पार्टी, फेस्टिव्हल आणि गॅदरिंगलाही घातले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 2:31 am

Web Title: stylish fashion ideas for women to go outing outfits ideas for a outing style statement for outing zws 70
Next Stories
1 पेटटॉक : स्वावलंबी ‘माऊ’ची देखभाल हवीच
2 पूर्णब्रह्म : पालक पनीर
3 कोड समज-गैरसमज
Just Now!
X