30 November 2020

News Flash

सुंदर माझं घर : सुबक सुगड

अ‍ॅक्रेलिक रंगाने आतून रंगवल्यास सुगडाची सछिद्रता कमी होते आणि गळती थांबवता येते.

संक्रांतीपासून हळदीकुंक समारंभ सुरू होतात आणि घरात छोटी-छोटी सुगड गोळा होऊ लागतात. मातीची ही सुबक भांडी टाकून तर द्यावीशी वाटत नाहीतच, पण त्यांचे काय करावे हेदेखील कळत नाही. आज ती कशी उपयोगात आणता येतील ते पाहू या.

साहित्य –

काळे किंवा लाल सुगड, जुनी लेस, सॅटिनचे छोटे गुलाब, गम, अ‍ॅक्रेलिक रंग, ब्रश.

कृती

  • लाल सुगडाला लाल किंवा लाल छटा असणाऱ्या आणि काळ्या सुगडाला एखाद्या गडद छटेच्या अ‍ॅक्रेलिक रंगाने आतून बाहेरून पूर्णपणे रंगवा. रंग पूर्ण वाळू द्या.
  • अ‍ॅक्रेलिक रंगाने आतून रंगवल्यास सुगडाची सछिद्रता कमी होते आणि गळती थांबवता येते.
  • रंग पूर्ण वाळल्यावर त्यावर एखादीच जुनी लेस चिकटवा.
  • सॅटिनचे छोटे गुलाब चिकटवून सुशोभन करता येईल. चित्रकलेत थोडी गती असल्यास अन्य रंगांनी चित्रे रंगवू शकता. फक्त सुशोभनाचा अतिरेक टाळा. अन्यथा बटबटीतपणा येईल.
  • तयार झालेल्या सुगडात वेष्टनात बांधलेला सुका खाऊ ठेवता येईल, पेन स्टॅण्ड, फुलदाणी किंवा केवळ शोभेची वस्तू म्हणून याचा वापर करता येतो.
  • सजवलेल्या सहा सुगडांचा सेट भेटवस्तू म्हणून देता येईल.

apac64kala@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 2:09 am

Web Title: sugad pujan sugad sankranthi 2018
Next Stories
1 खाद्यवारसा : भरली वांगी
2 सांगे वाटाडय़ा : पूर्वाभ्यास गरजेचा
3 सवलतींपासून सावधान!
Just Now!
X