डॉ. अरुणा टिळक

उन्हाळय़ामध्ये पचण्यास जड असा आहार वर्ज्य करावा लागतो. आपण मात्र बाराही महिने चिवडा, लाडू, पुरणपोळी खातो. त्यामुळे आपल्याला नानाविध आजार उद्भवू शकतात, ही गोष्ट कुणाच्या लक्षात येत नाही.

water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…

गारेगार आइसक्रीमच्या जाहिराती दिसायला लागल्या आणि सरबताच्या गाडय़ा गल्लोगल्ली अवतरल्या की उन्हाळा आला, हे वेगळे सांगावे लागत नाही. होळीपर्यंत असलेली थंडी खरोखरच एका दिवसात निघून जाते हे आपण नेहमीच अनुभवत असतो. म्हणूनच ‘होळी जळाली थंडी पळाली’ अशी म्हण व्यवहारात वापरली जाते. आपल्याकडे जे तीन ऋ तू  आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्यानुसार निसर्गात फळे, भाज्या, येत असतात. त्यामुळे आपल्या सण-उत्सवांमधील पदार्थही त्या ऋतूनुसार असतात. उन्हाळय़ामध्ये पचण्यास जड असा आहार वर्ज्य करावा लागतो. आपण मात्र बाराही महिने चिवडा, लाडू, पुरणपोळी खातो. त्यामुळे आपल्याला नानाविध आजार उद्भवू शकतात, ही गोष्ट कुणाच्या लक्षात येत नाही.

उन्हाळय़ात तप्त हवामानामुळे वातावरण शुष्क झालेले असते. त्यामुळे शरीरातसुद्धा कोरडेपणा निर्माण झालेला असतो. आपली भूक कमी झालेली असते. अन्न कमी जाते, तहान जास्त लागते आणि शरीरातील शक्तीसुद्धा कमी झालेली असते. अशा वेळी पचण्यास हलके असे अन्न घ्यावे. द्रवाहार घ्यावा की ज्याने पोटपण भरेल आणि ताकदसुद्धा येईल. नाचणीचे पीठ दोन चमचे थोडय़ा पाण्यात कालवून घ्यावे आणि ते शिजवावे व त्यात मीठ घालावे. ताकामध्ये जीरेपूड, आल्याचा रस, कोथिंबीर, थोडी मिरची घालून दोन्ही एकत्र करावे. अतिशय पौष्टिक  अशी नाचणी आंबील तयार. तसेच सातूच्या पिठाची पातळ लापशी, शिंगाडा पिठाची लापशीही उपयुक्त ठरते.

ग्रीष्म ऋ तूत वातदोषाचा संचय होत असतो. भूक कमी होते. त्यामुळे स्निग्ध परंतु पचण्यास हलका गोड, आंबट आणि खारट चवीचा रसदार आहार घ्यावा (ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे असा द्रव आणि गुणाने शीत पदार्थ.) या दिवसांत शक्यतो दोन घास कमीच आहार घ्यावा. न्याहारीला तांदूळ भाजून केलेला भात+तूप+मीठ, भाताची गरमागरम पेज घ्यावी.

थंड आणि उष्ण पदार्थ कोणते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

* थंड पदार्थ – कलिंगड, सफरचंद, चिकू, लिंबू, कांदा, काकडी, पालक, कच्चा टोमॅटो, कोबी, गाजर, मुळा, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, बीट, बडिशेप, वेलची, डाळिंब, उसाचा रस (बर्फ न घालता), शहाळे पाणी, मूग डाळ, उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, माठातील पाणी, तुळस, तुळशीचे बी, सब्जा बी, नीरा मनुका, अंडी (फक्त उकडलेले पांढरे) दूध, दही तूप.

* उष्ण पदार्थ- आंबा, संत्रे, अननस, आले, लसूण, बटाटा, कारले, मिरची मेथी, वांगे, गवार, पपई, तूरडाळ, चणाडाळ, गूळ, तीळ, हळद, चहा, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर, पनीर, बाजरी, नाचणी, आइसक्रीम, श्रीखंड / आम्रखंड, कोल्ड्रिंक.

काय खावे?

* भाज्यांमध्ये भेंडी, फ्लॉवर, पडवळ, गाजर, रताळे, बीट, सुरण अशा नैसर्गिक मधुर रसात्मक भाज्यांचा भोजनात विशेषत्वाने समावेश करावा. डाळींमध्ये मूग, मुगाची सालीची डाळ, मुगाची डाळ, अख्खे मसूर यांचा वापर जास्त ठेवावा.

*  भाजी, आमटीत आले, धणे, जिरे, हिंग, हळद, धने पावडर जास्त वापरावी. अनेक आंबट फळे निसर्ग आपल्याला देत असतो. या सर्व फळांचा जरूर वापर करावा. कैरी, करवंद, आवळा (राय आवळे), कोकम ही आंबट रसाची फळे या रानमेव्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. तसेच आंबा, फणस डाळिंब, खरबूज, टरबूज, जांब, संत्रे, मोसंबी अशा रसाळ फळांचे सेवन करावे. ही फळे चावून खावीत. त्याचा रस पिऊ नये.

*  गुलकंद, मोरावळा जरूर वापरावा. तुळशीचे बी, सब्जाचे बी पाण्यात भिजत घालावे. ते दोन तासात चांगले फुगते. मग ते दुधात साखर घालून त्याबरोबर घ्यावे. याने लघवीला होणारी जळजळ थांबून लघवी होणे, ही लक्षणे कमी होतात.

*  गुढीपाडव्याला आपण श्रीखंड करतो. ते खाऊ शकतो. पण त्यातसुद्धा केशर वेलची, जायफळ या गोष्टी श्रीखंड पचवायला मदत करतात. त्यात तूप जरूर घालावे.

*  उन्हाळा सुरू होताच केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे. ती भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीपासून बनवतात. भिजलेली डाळ ही पचायला हलकी असते.आंबट रसामुळे आणि भरपूर तेलामुळे ती पचते. कैरीचे पन्हे हे गोड, आंबट असल्यामुळे भूक वाढवते. तोंडाला चव येते. उन्हाचा त्रास कमी होतो.

ताक, दह्य़ाचे सेवन?

मी थंडगार दही रोज खाईन, भरपूर ताक पीईन की मला उन्हाचा त्रास होणारच नाही, असे सर्वाना वाटत असते. मात्र ताक हे थंड नसते. दही तर मुळीच नाही. त्यामुळे उन्हाळय़ात याचे सेवन जास्त करू नये. जेवणानंतर घासभर भात आणि ती भिजेल एवढेच दही वापरावे. दही खायचे झाले तर ते तूप, मध, मुगाचे कढण यांबरोबर अल्प मात्रेत सेवन करावे. ताक घेतलेच तर ताज्या विरजलेल्या दह्याचे गोड, फ्रीजमध्ये न ठेवलेले वाटीभर घ्यावे.

*  रामनवमी, हनुमान जयंतीला ‘सुंठवडय़ाचा प्रसाद’ असतो. सुंठ ही उत्तम प्रकारे भूक लागण्यासाठी, अन्न पचनास मदत करते, तसेच ती उत्कृष्ट पित्तशामक आहे. त्यामुळे मधूनमधून पाव चमचा सुंठ, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा साखर असे मिश्रण करून त्यातील अर्धा चमचा सुंठवडा खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते.

*  नारळ पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, करवंद सरबत, काजूच्या बोंडाचे सरबत, जास्वंद सरबत जरूर प्यावीत.