विविध तंत्रज्ञान व्यासपीठ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील कामकाज सोपे करण्यामध्ये सध्या डिजिटल नेटवर्कचा मोठा वाटा आहे. डिजिटल नेटवर्कमुळे व्यापक प्रमाणावर काम करणे सोपे झाले आहे. उद्योगांतील डिजिटल उत्क्रांतीमुळे कर्मचारी, भागीदार आणि ग्राहक यांच्यासाठी कामात गतिशीलता निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाचा हा कल आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. मोबाइल, सोशल मीडिया, स्मार्टफोन, बृहद् डेटा, क्लाऊट अशा सर्वच प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान पूर्वीसारख्या ‘आयटी’ आधारित तंत्रज्ञानापेक्षा खूपच वेगळे आहे. हे तंत्रज्ञान ग्राहकांपर्यंत थेट पोहोचते आणि या संवादाच्या माध्यमातून मूल्य आणि महसूल यांवर चांगला प्रभाव पडतो.

आज प्रत्येक कंपनी भविष्यातल्या प्रगतीसाठी आपल्या क्षमतांमध्ये वृद्धी करण्याची अपेक्षा ठेवतानाच यासाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी निरनिराळे मार्ग शोधले जात आहेत. अशा वेळी तंत्रज्ञानातील नवनवीन बदलांचा त्यांना नक्कीच उपयोग होऊ शकतो.

२०१७मध्ये बदल घडवून आणणारी आणि २०१८ वर राज्य करणारी काही तंत्रज्ञाने खालीलप्रमाणे आहेत

इंटेलिजंट सोल्युशन्स

ड्रोन, स्मार्ट उपकरणे यासारख्या नावीन्यपूर्ण उपकरणांच्या माध्यमातून आसपासचा परिसर आणि लोकांशी समन्वय साधणे सोपे झाले आहे. नवीन आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि यांत्रिक ज्ञानावर आधारित मॉडेलच्या साह्याने स्वयंचलित ड्रोन आणि रोबोट यांच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होणार आहे. अ‍ॅप, मोबाइल, वेअरेबल आणि ‘आयओटी’ अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणांमुळे एक डिजिटल नेटवर्क तयार झाले आहे.

व्हर्च्यूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी

सध्या ‘व्हीआर’ आणि ‘एआर’ तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. ही संगणकीय उपकरणांची एक नवीन क्रांती असून त्यातून व्यक्तींची एकमेकांशी संवादाची पद्धत बदलली जाईल. त्यांनी अ‍ॅप्स, मोबाइल्स, वेअरेबल्स आणि आयओटी उपकरणांसोबत जोडून घेऊन एक डिजिटल नेटवर्क तयार केले आहे.

आयओटी आणि स्मार्ट होम टेक मागील अनेक वर्षांपासून आयओटीच्या (इंटरनेट ऑफ िथग्स) क्रांतीबाबत आणि त्याच्या स्मार्ट होम तंत्रज्ञानासोबत आंतर जोडणीच्या संदर्भात चर्चा करण्यात येत आहे. बाजारात अनेक वैयक्तिक उपकरणे आणि अ‍ॅप्स आहेत, परंतु, या सर्वाना एकत्रितपणे जोडून ठेवण्यात या तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते.

एआयफाऊंडेशन

डिजिटल तंत्रज्ञान, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, ऑटोमेशन यांचा भविष्यात कामाची पद्धत आणि रोजगार यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे. प्रत्येक तंत्रज्ञानात ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ उपयुक्त ठरत आहे.

इंटेलिजेन्ट एपीपी आणि अ‍ॅनालिटिक्स

भविष्यात बिग डेटा आणि अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट यांचा संगम होणार असून यातून ‘इंटिलिजन्स अ‍ॅप्स’चा जन्म होणार आहे. हे अ‍ॅप्स ग्राहक, उत्पादन आणि कार्यान्वयन माहिती यांचा मिलाफ घडवून आणतील. प्रमुख वापरकर्त्यांच्या निर्णयांनुसार काम करण्याच्या पलीकडे जात वापरकर्त्यांसाठी सुसंगत आणि मौलिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरतील.

मनोजकुमार पन्सारी

लेखक अ‍ॅस्ट्रमया कंपनीचे सीइओ आहेत.