बाजारात दिवसेंदिवस अद्ययावत तंत्रज्ञान येत आहे. यामध्ये मोबाइल उत्पादनांची संख्या अधिक आहे. अशाच टेक्नो कंपनीचे उत्पादन असणाऱ्या ‘कॅमन आय एस टू एक्स’ या मोबाइलविषयी जाणून घेऊ या..

२०१८ या वर्षांत उत्तमोत्तम मोबाइल उत्पादने टेक्नो कंपनीने बाजारात आणली. २०१९ या वर्षांत पहिलेच उत्पादन टेक्नो कंपनीने बाजारात आणले आणि ग्राहकांना या उत्पादनाने भुरळ घातली. हे उत्पादन म्हणजे ‘कॅमन आय एस टू एक्स’ होय. ९ हजार ४९९ रुपये किंमत असणाऱ्या या मोबाइलला बाजारात मोठी मागणी सध्या सुरू आहे.

१३.९७ सेंमी आकाराच्या या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. त्यामुळे तो हाताळण्यास अतिशय सोयीस्कर आहे. सध्या अनेक मोबाइलचा मोठा आकार वापरकर्त्यांना हाताळताना त्रासदायक ठरतो. मात्र, ‘कॅमन आय एस टू एक्स’बाबत तशी अडचण जाणवत नाही. या मोबाइलमध्ये १४४० बाय ७२० रेझोल्युशनचा एचडी प्लस डिस्प्ले असल्याने व्हिडीओ पाहण्याचा आनंद चांगला आहे. ३ जीबी रॅमची सुविधा या मोबाइलमध्ये देण्यात आली असून मोबाइलमध्ये एकाच वेळेला अनेक अ‍ॅप्लिकेशन सुरू केले असता मोबाइल हँग होत नसल्याचे दिसून आले.

अँड्रॉइड ओरिओ ८.१ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या या मोबाइलमध्ये दोन गिगाहार्ट्झ क्षमतेचा प्रोसेसर पुरवण्यात आला आहे. यामध्ये ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज पुरवण्यात आली असून ती १२८ जीबीपर्यंत वाढवता येते.

उत्तम कॅमेरा गुणवत्ता ‘कॅमन आय एस टू एक्स’ मोबाइलमध्ये पाहायला मिळते. रेअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा असून फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा अधिक दर्जेदार असल्याने सेल्फी काढण्यासाठी उत्तम मोबाइल असल्याचे वापकर्त्यांनी सांगितले. व्हिडीओ चॅट फ्लॅशचा पर्यायही मोबाइलमध्ये पाहायला मिळतो.

३०५० एएमपीएच इतके बॅटरी आयुष्य या मोबाइलला आहे. मोबाइलचा अधिक काळ वापर केला तरी बराच काळ मोबाईलची बॅटरी टिकून राहते. सुरक्षेसाठी मोबाईला पाठीमागच्या बाजूस फिंगर िपट्रची सुविधा देण्यात आली आहे. ‘कॅमन आय एस टू एक्स’ मोबइलचे फिंगर सेन्सेशन टेक्नोच्या इतर मोबाइलच्या तुलनेत अधिक उत्तम असल्याचे पाहायला मिळते. फेस लॉकचा पर्यायही मोबाइलमध्ये पाहायला मिळतो.

‘कॅमन आय एस टू एक्स’मधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मोबाइलमध्ये तीन मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आले आहे. त्यामुळे नेटवर्क सुविधा पुरवणाऱ्या तब्बल तीन नेटवर्क कार्डचा वापर आपल्याला मोबाइमध्ये करायला मिळतो.

लक्झरी गोल्ड, एलीगन्स ब्लॅक आणि ब्लू ब्लॅक या तीन युनीक रंगांमध्ये मोबाइल बाजारात उपलब्ध आहेत. आकर्षक रंगांमुळे ‘कॅमन आय एस टू एक्स’ मोबाइल उठावदार दिसत असल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. ग्राहकांना १० हजार रुपयांच्या आतील बजेटमध्ये मोबाइल विकत घेण्यासाठी ‘कॅमन आय एस टू एक्स’ हा एक चांगला पर्याय आहे.