क्रांती आठल्ये (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)

केसांची निगा हा आपल्या सर्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी आधी आपण केसांची रचना समजून घेऊ. केस हे केरॅटिन नामक प्रथिनांनी बनलेले असतात. त्याचबरोबर फॅटी अ‍ॅसिड ओमेगा – ३ (चरबीयुक्त आम्ल) असतात. त्यामुळे केस लवचीक व चमकदार असतात.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

केसांच्या रचनेत वरील भागात ‘क्यूटिकल’ तर आतील भागात कॉरटेक्स असते. मध्यभागी मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. त्याचे दोन प्रकार असतात. ‘युमेलनायिन’ या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असल्यास केस तपकिरी ते काळ्या रंगांच्या छटांत असतात. त्याचप्रमाणे ‘फियोमेलनायिन’ या रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असल्यास केसांचा रंग भुरा किंवा लालसर असतो.

केसांचे आरोग्य आपल्या शारीरिक आरोग्यावर अवलंबून आहे. केसांच्या मुळांशी तेलाने हलकी मालीश केल्यास केसांचा राठपणा कमी होतो व रक्ताभिसरण वाढते.

केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. आपल्या त्वचेप्रमाणे शॅम्पूचे चयन करावे. शॅम्पूमध्ये पृष्ठक्रियाकारी (र्सफकटेन्ट) असतात. हे घटक धूळ व तेल धुऊन काढण्याचे काम करतात. त्याचबरोबर त्यात संरक्षक व सुगंधी द्रव्ये घातली जातात. कोंडा (बुरशी) झाल्यास आपण अँटी डॅण्ड्रफ शॅम्पू वापरतो. त्यात किटाकोनोझॉल व दोन इतर रासायनिक घटक बुरशीला नष्ट करण्याचे काम करतात. हे श्ॉम्पू डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावेत. शॅम्पू वापरल्यामुळे केस मोकळे होतात व त्यातील आद्र्रता कमी होते. म्हणून कंडिशनरचा वापर केला जातो. याच्यात सिलिकॉन नावाचे बहुवारिक असतात ते केसांवर थर बनवतात व गुंता होत नाही.

केस रंगवणे किंवा काळे करणे हे पूर्वीपासून चालत आले आहे. पूर्वी नैसर्गिकरीत्या मिळणारे रंग उदा. मेहंदी, हळद, नीळ, केशर यांचा वापर करून केस रंगवले जात असत. ‘लॉरियल’चे संस्थापक यूजीन शूलर यांनी रासायनिक प्रक्रिया करून प्रथम १९०७ मध्ये केसांचा रंग बनवला. त्यामध्ये ‘पॅराफिनाइल डायअमिन’चे दोन घटक असतात. यांपैकी ऑक्सिडायजिंग एजंट (हायड्रोजन पॅरॉक्साइड) किंवा डेव्हलपर केसांमधील मूळ रंगद्रव्य कमी करते. तर अमोनिया हा क्युटिकल उघडून हेअर डायमधील रंगाला आत जाऊन कॉर्टेक्समध्ये पोहोचवतो.

जेव्हा आपल्याला विविध रंगांच्या छटा आणायच्या असतात, तेव्हा त्यात कपलर एजंट घातले जातात. अमोनियाविरहित हेअर डायचा बऱ्याचदा प्रचार केला जातो. त्यामध्ये  अमोनिया न वापरता मोनो इथॅनोलमाइन व तत्सम रसायन वापरले जाते.

पूर्वीच्या हेअर डायच्या तुलनेत आपल्याला बरेच फरक जाणवतात. डाय कोठेही त्वचेवर लागली की तो पक्का बसत असे. परंतु आता ही रसायने फक्त केसांच्या पेशींवर प्रक्रिया करतात. म्हणून डाय लागला की धुऊन टाकला की निघून जातो. त्याच्यात सरफॅक्टंट घातल्यामुळे आपण शॅम्पू लावल्याप्रमाणे लावू शकतो. जरी आपण हेअर डाय वापरणार असू तरी खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. त्या खोक्यावरील सूचना वाचाव्यात व पॅच टेस्ट करून घ्यावी. म्हणजेच थोडासा डाय लावून पाहावा व ४८ तास कुठला ही त्रास झाला नाही म्हणजे तो आपण वापरू शकतो.

वरील मुद्दय़ांइतकेच केसांची मुळे बळकट व्हावी याकरिता संतुलित आहार महत्त्वाचा आहे. संतुलित आहार म्हणजे जीवसत्त्व अ, ई, ब-१२, क, ड, लोह, जस्त, खनिजे व ओमेगा-३ आवश्यक आहेत. यासाठी रोजच्या आहारात आवळे, पपई, गाजर, पालेभाज्या, मासे, अंडी यांचा समावेश करावा. शाकाहारी लोकांनी मासे व अंडी ऐवजी अक्रोड, राजमा, सोयाबीन तेल व बदाम यांचे सेवन करावे.