उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ आणि जंतुरहित पाणी पिणे आवश्यक आहे. कारण दूषित पाणी अनेक रोगांना निमंत्रण देते. यासाठीच अनेक घरांमध्ये वॉटर प्युरिफायर असते. मात्र पाणी शुद्ध करणाऱ्या या यंत्राची योग्य देखभाल करणेही आवश्यक आहे.

* पाणी शुद्ध केल्याने वॉटर प्युरिफायरमध्ये पाण्यातील जंतू, धूलीकण, गाळ जमा होतो. त्यामुळे तज्ज्ञांकडून वॉटर प्युरिफायरची वेळोवेळी सव्‍‌र्हिसिंग करून घेणे आवश्यक आहे. किमान सहा महिन्यांतून एकदा सव्‍‌र्हिसिंग करून घ्यावी.

* वॉटर प्युरिफायर नियमित स्वच्छ करा. स्वच्छ फडक्याने वॉटर प्युरिफायरची वरील बाजू साफ करा. त्यावर धूळ जमा होऊन देऊ नका.

* वॉटर प्युरिफायरचा नळ व्यवस्थित बंद करा. नाही तर त्यातून पाणी ठिपकू शकते. जर नादुरुस्त झाल्याने पाणी ठिपकत असेल, तर त्याची तात्काळ दुरुस्ती करा.

* वॉटर प्युरिफायरच्या नळाला आवरण असेल तर ते लावा. कारण डास किंवा इतर कीटक नळातून वॉटर प्युरिफायरमध्ये जाऊ शकतात.

* वॉटर प्युरिफायर पाण्याने पूर्णपणे भरल्यानंतर वीजपुरवठा बंद करा. वीजपुरवठा चालू राहिल्यास हे यंत्र नादुरुस्त होऊ शकते.

* वीजपुरवठा कमी असेल तर वॉटर प्युरिफायर चालू करू नका.